शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया पंचायत समितीचे सभापतीच ठोकणार शिक्षण विभागाला ६ डिसेंबरला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:49 IST

पंचायत समिती कार्यालयांतर्गत शिक्षण विभागाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडे वारंवार विनंती करूनही कारवाई नाहीपंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागावर रोष

आॅनलाईन लोकमतगोंदिया : अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या विविध शिक्षकांच्या निलंबनाचे प्रस्ताव ६ ते ७ महिन्यांपासून जि.प. येथे पाठवूनही अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही. तसेच शिक्षण विभागात अनेक रिक्त पदांसंदर्भात पत्र व्यवहार करुनही जिल्हा परिषदेकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयांतर्गत शिक्षण विभागाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर येथील सहायक शिक्षक आर.के. फुलबांधे यांच्या निलंबनाचे प्रस्ताव (जा.क्र.२०४८/१७ दि. १७ एप्रिल २०१७), जि.प. प्राथमिक शाळा माहुरकुडा येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक ए.एम. चौधरी यांच्या निलंबनाचे प्रस्ताव (जा.क्र.२१८२/१७ दि.३ मे २०१७) व जि.प. प्राथमिक शाळा झाशीनगर येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक ए.के. खंडाते यांच्या निलंबनाचे प्रस्ताव (जा.क्र. २४१८/ दि.२५ मे २०१७) पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा परिषद येथे पाठविण्यात आले आहे. परंतु अद्यापही सदर शिक्षकांच्या निलंबनाच्या प्रस्तावांवर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.तसेच गट शिक्षणाधिकारी हे पदसुद्धा अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय कार्यभारावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याबाबतसुद्धा पंचायत समितीच्या वतीने यापूर्वी विविध पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही सदर प्रस्तावांबाबत काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत कळले नसल्याचे सभापती शिवणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.पंचायत समिती अर्जुनी मोरगाव कार्यालयांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या निलंबनाचे व स्वेच्छानिवृत्तीचे प्रस्ताव अद्याप निकाली काढण्यात आले नाही. तसेच शिक्षण विभागांतर्गत रिक्त पदे भरण्याची कार्यवाही अद्यापही करण्यात आली नाही.त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात ६ डिसेंबर विभागात दुपारी १२ वाजता अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कुलूप ठोकून आंदोलन करणार, असा इशारा सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकGovernmentसरकार