लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : यंदा संसर्गजन्य कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वत्र असल्यामुळे शासकीय नियम तसेच सण व उत्सवातील नियमांत खूप फेरबदल झाले आहेत. त्या अनुषंगाने आपली जबाबदारी पार पाडत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून पोळा व गणेशोत्सव शांततेत पार पाडावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले.पोळा व गणेशोत्सव सणानिमित्त पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पोलीस पाटील, गणेश मंडळ व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल होते. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी घोरपडे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी नालकूल यांनी, येणाऱ्या पोळा आणि गणेशोत्सव व इतर सणासुदीच्या काळात संक्रमणाची रोकथाम करता येईल याबद्दल शासनाच्या निर्गमित सूचनेनुसार पोळा आणि गणेशोत्सव व इतर सणाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी करु नये, रैली काढू नये, फिजिकल डिस्टंन्सिगचे पालन करून गुण्यागोविंदाने सण साजरे करावे असे सांगीतले.या बैठकीला शांतता समितीचे सदस्य नटवरलाल गांधी, हुकुमचंद बहेकार, राधाकिसन चुटे, छबू उके, पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा चुटे, तालुकाध्यक्ष सुरेश कोरे, पोलीस पाटील प्रदीप बावनथडे, संजय हत्तीमारे, प्रदीप चुटे, किशोर दोनोडे, शीला रहिले, शकुन पाथोडे, गणेश मंडळाचे रमण डेकाटे, प्रवीण अग्रीका, आनंद शर्मा यांच्यासह इतर पोलीस पाटील, शांतता समिती व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था राखून सण साजरे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST
पोळा व गणेशोत्सव सणानिमित्त पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पोलीस पाटील, गणेश मंडळ व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल होते. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी घोरपडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था राखून सण साजरे करा
ठळक मुद्देसुभाष चव्हाण : पोलीस ठाण्यात पोळा व गणेशोत्सवानिमित्त बैठक