गोंदिया : मध्य प्रदेशातील जबलपूर येथून गोंदियाकडे येत असलेल्या एका छत्तीसगढ पासिंगच्या इनोव्हा कारमधून एक हजार रुपयांच्या नोटांची २० बंडल (२० लाख रुपये) जप्त करण्यात आली. ही कारवाई मध्य प्रदेश सीमेवरील रजेगावजवळच्या कोरणी नाक्यावर दुपारी २.३० वाजता भरारी व दक्षता पथकाने संयुक्तपणे केली. वाहनातील तीन लोकांना त्या रकमेचा कोणताही हिशेब देता आला नसल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.येत्या १९ नोव्हेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या मोटारीत पीयूषकुमार प्रकाशचंद चौबे (४९, रा. वर्धमान नगर, राजनांदगाव, छत्तीसगढ), यशवंतकुमार धनीराम जंघेल (२६, रा. चिखली, जि. राजनांदगाव) आणि गाडीचालक संतोष निसार (३३, रा. राजनांदगाव) हे तिघे होते. त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी आयकर विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती. (प्रतिनिधी)
मध्य प्रदेशातून आलेली रोकड केली जप्त
By admin | Updated: November 16, 2016 06:25 IST