शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे वाहक-चालक ठरविणार बस कुठे जाणार, कुठे थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी कोठे चालवायची, कोठे थांबवायची, तिचा वेळ आदींबाबत प्रस्ताव मांडतील. यावर आगारप्रमुख व अन्य कर्मचारी आपसांत चर्चा करून एकमताने निर्णय घेतील. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्व काही अस्तव्यस्त झाले आहे. यात कित्येकांचे नुकसान झाले असून, कित्येकांच्या हातचा रोजगारही हिरावला गेला आहे. यापासून राज्य रस्ते परिवहन महामंडळही सुटले नसून त्यांना चांगलाच फटका बसला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही विसरता येत नसून नागरिकांनी आता प्रवास टाळणेच पसंत केल्याचे दिसते. यामुळे आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी कोठे चालवायची, कोठे थांबवायची, तिचा वेळ आदींबाबत प्रस्ताव मांडतील. यावर आगारप्रमुख व अन्य कर्मचारी आपसांत चर्चा करून एकमताने निर्णय घेतील. एकंदर चालक-वाहकांचा अनुभव आता महामंडळ तोट्यातून बाहेर निघण्यासाठी वापरून घेतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रवाशीे संख्येत वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध प्रयोग राबविले जात आहे. 

मार्ग, थांबेही ठरविणार- एखाद्या मार्गाने जाणारी एसटी थांब्याशिवाय थांबत नाही व त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. याशिवाय प्रवाशांच्या सोयीनुसार एसटीची वेळ नाही किंवा या मार्गावर एसटी येत नाही, अशा तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. यामुळे आता चालक-वाहक अशा मार्गांवर एसटी चालवायची, प्रवाशांच्या वेळेनुसार एसटीची वेळ बदलायची, एखाद्या ठिकाणी प्रवासी बघून प्रतिसाद बघून थांबा द्यायचा या सर्व सूचना मांडतील व त्यावरून आता निर्णय घेतले जातील. 

चालक-वाहकांच्या सूचनांसाठी रजिस्टर- चालक-वाहक एसटी घेऊन थेट जनतेत जातात व यामुळे त्यांचा शेकडो नागरिकांशी संपर्क येतो. अशात नागरिकांच्या प्रतिक्रिया व अपेक्षा त्यांना कळतात. यातून आता चालक-वाहक आगार प्रमुखांना याबाबत कळवतील व एसटी कोठे थांबवायची, कोठे चालवायची, वेळेत काही बदल करायचा आदींबाबत प्रस्ताव मांडतील. या सर्वाची नोंद करून घेण्यासाठी एक रजिस्टर तयार केले जाणार आहे. त्यामध्ये चालक-वाहकांनी दिलेल्या सूचनांची नोंद करून ठेवली जाईल. 

चालक-वाहकांच्या सूचनांचे स्वागत एसटीला घेऊन चालक-वाहक थेट जनतेत जातात व यामुळे त्यांना जनतेच्या काय प्रतिक्रिया व अपेक्षा आहेत हे कळते. याचाच फायदा महामंडळ घेणार असून, चालक-वाहकांच्या सूचनांचे स्वागत आहे. - संजना पटले, आगारप्रमुख, गोंदिया

 

 

टॅग्स :state transportएसटी