शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

सावधान, अल्पवयीनांना वाहन देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शाळा-महाविद्यालय व ट्यूशनच्या वाढत्या बोजाखाली आजची पिढी दाबल्या जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचा ‘टाईम-टेबल फिक्स’ आहे. दिवसभरातील धावपळीत विद्यार्थी खचून जात असून त्यांना धावपळीत थोडी सोय म्हणून पालक वाहन हाती देत आहेत. ५०० -१००० रूपये भरून वाहन हाती येत असल्याने पालकही फायनन्सवर वाहन खरेदी करून आपल्या अल्पवयीन पाल्यांना देत आहेत.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेचे फर्मान : पालकांसाठी धोक्याची घंटा,पोलीस विभागाची मोहीम

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बिनधास्तपणे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अल्पवयीनांच्या हातून घडलेल्या अपघातांचे नुकसान त्यांना सहन करावे लागत नसले तरी अपघातग्रस्त व्यक्तीच नव्हे तर अपघात घडविणाºया अल्पवयीनांच्या पाल्यांना मात्र त्याचा जबर फटका सहन करावा लागतो. हे प्रकार टाळण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण शाखेची अल्पवयीन वाहनचालकांवर करडी नजर आहे. सोबतच वाहतूक नियंत्रण शाखेने अल्पवयीनांना वाहन देणाºया पालकांनाही सावध होण्याचा इशारा दिला आहे.शाळा-महाविद्यालय व ट्यूशनच्या वाढत्या बोजाखाली आजची पिढी दाबल्या जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचा ‘टाईम-टेबल फिक्स’ आहे. दिवसभरातील धावपळीत विद्यार्थी खचून जात असून त्यांना धावपळीत थोडी सोय म्हणून पालक वाहन हाती देत आहेत. ५०० -१००० रूपये भरून वाहन हाती येत असल्याने पालकही फायनन्सवर वाहन खरेदी करून आपल्या अल्पवयीन पाल्यांना देत आहेत. यामागील आपल्या पालकांचे प्रेम समजून घेता अल्पवयीन मुले-मुली अतिरेक करीत असून भरधाव वेगात वाहन चालवित फॅशन दाखवित आहेत. यात मात्र कित्येकदा अपघात घडत असून त्यांचे स्वत:चे तसेच समोरच्या व्यक्तीचे नुकसान करीत आहेत.अपघातांचे वाढते प्रमाण व अल्पवयीनांकडून नियम तोडून सुरू असलेल्या वाहनांच्या या दुरूपयोगावर अंकुश बसविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी अल्पवयीन वाहनचालकांविरोधात मोहिम छेडली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची अल्पवयीन वाहनचालकांवर करडी नजर असून त्यांच्या हाती लागल्यास अल्पवयीन वाहनचालक व त्यांच्या पालकांनाही याचा फटका सहन करावा लागणार आहे.अल्पवयीन मुला-मुलींना वाहन हाती देणे गुन्हा असताना पालक त्याकडे दुर्लक्ष करीत अल्पवयीन मुला-मुलींना वाहन देऊन नियमभंग करीत आहेत. यामुळेच वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांनाच आता अल्पवयीनांना वाहन देऊ नका अशा इशारा दिला आहे.तीन महिने कारावास व दंडाची तरतूदअल्पवयीन मुला-मुलींना वाहन देणे हा गुन्हा आहे. मात्र पालक याकडे दुर्लक्ष करीत असून १००-२०० रूपये दिल्यावर काहीच होत नाही असा गैरसमज बाळगून आहेत. मात्र नियमानुसार अल्पवयीनांना वाहन देणाऱ्यांस ३ महिने कारावास व दंडाची तरतूद आहे. वाहतूक पोलिसांच्या हाती लागणाऱ्या अल्पवयीन वाहन चालकांच्या पाल्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. याकरिता वाहतूक नियंत्रण शाखेने मोहिम सुरू केली असून सूचना म्हणून नागरिकांना अल्पवयीनांना वाहन देऊ नका असा इशाराच दिला आहे.८० अल्पवयींनाकडून ४६ हजारांचा दंड वसूलवाहतूक नियंत्रण शाखेने अल्पवयीनांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८० अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांकडून ४६ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. हे दंड वसूल केल्याची आकडेवारी असून या व्यतीरिक्त आणखीही केसेस करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेने पालक ांना पहिली चूक म्हणून फक्त दंड घेऊन सोडून दिले आहे. मात्र यापुढे नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.आतापर्यंत चालकांना दंड आकारून सोडून दिले आहे. मात्र यापुढे अल्पवयीन वाहनचालक हाती आल्यास त्यांची केस थेट न्यायालयात पाठविली जाईल. त्यावर न्यायालय नियमानुसार जी कारवाई करेल त्याला संबंधितांना सामोरे जावे लागेल.- दिनेश तायडे, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस