देवरी : देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धोबीसराड या गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर गुरुवारी (दि.१३) सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास एका कारला ओव्हरटेक करणाऱ्या दुसऱ्या वाहनाने धडक दिली. यात कार डिव्हायडरवरून उलटली. कारमध्ये बसलेल्या पाच जणांपैकी एक जण जखमी झाला. सविस्तर असे की, गुरुवारी (दि.१३) नागपूरच्या प्रतापनगर येथील रहिवासी एस.वर्मा हे आपल्या कुटूंबातील चार लोकांना घेऊन नागपूरवरून डोंगरगडकडे कार (क्रमांक एमएच४९/बी-८०२३)ने जात असता ४.४५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धोबीसराड या गावाजवळ दुसरे वाहन ओव्हरटेक करीत असताना या कारला धडक लागली. यात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकून उलटली. जखमीला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)
धोबीसराडजवळ कारला अपघात
By admin | Updated: April 14, 2017 01:45 IST