शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन आणि कोलांटउड्यांंचा दिवस

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक प्रमुख उमेदवारांमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ लागली होती. उमेदवारी दाखल करताना

११५ उमेदवारांचे नामांकन : तिकीट कापताच अनेकांची पळापळीगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक प्रमुख उमेदवारांमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ लागली होती. उमेदवारी दाखल करताना मोठी रॅली काढत माहौल बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील चार मतदार संघात एकूण ११५ उमेदवारांनी १८६ नामांकन दाखल केले. त्यात सर्वाधिक चढाओढ गोंदियात दिसून आली.गोंदिया मतदार संघात चार दिवसात ४३ उमेदवारांनी ७७ नामांकन, तिरोड्यात २६ उमेदवारांनी ४४ नामांकन, आमगावात ११ उमेदवारांनी १६ नामांकन तर अर्जुनी मोरगाव मतदार संघात ३५ उमेदवारांनी ४९ नामांकन दाखल केले.युती आणि आघाडीची भट्टी शेवटच्या क्षणी न जमल्यामुळे बेसावध असलेल्या काही पक्षांना सशक्त उमेदवार शोधणे कठीण झाले होते. यातच सर्वाधिक इच्छुकांची संख्या असणाऱ्या भाजपात उमेदवारीची आस लावून बसलेल्यांनी निराश न होता इतर पक्षांकडून आपलेली ‘आॅफर’ स्वीकारून संधीचे सोने करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यात त्यांना किती यश येते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. शनिवारी नामांकन दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये गोंदियातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता, बहुजन समाज पार्टीचे योगेश उर्फ मामा बन्सोड, आमगाव मतदार संघात भाजपचे संजय पुराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश ताराम, शिवसेनेचे मुलचंद गावराने आणि बसपाच्या शारदा उईके, तिरोड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर, भाजपचे विजय रहांगडाले, शिवसेनेचे पंचम बिसेन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पी.जी.कटरे, बसपाचे दीपक हिरापुरे आणि दिलीप बन्सोड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.अर्जुनी मोरगाव मतदार संघात भाजपाचे आ.राजकुमार बडोले, काँग्रेसकडून राजेश नंदागवळी, बसपाचे बी.के.मेश्राम तसेच काँग्रेस बंडखोर रत्नदीप दहीवले व राकाँचे बंडखोर मिलन राऊत यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले आहे.यावेळी भाजपाच्या चार इच्छुकांनी इतर पक्षांमध्ये कोलांटउडी घेऊन त्यांच्या तिकीटवर नामांकन भरले आहे. त्यात तिरोडा मतदार संघातून भाजपचे माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन यांनी शिवसेनेच्या तिकीटवर, आमगाव विधानसभा मतदार संघातून गेल्यावेळी भाजपचे उमेदवार असलेले रमेश ताराम यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटवर नामांकन भरले. याच मतदार संघात भाजपचे सदस्य मुलचंद गावराणे यांनी शिवसेनेचा झेंडा पकडत त्यांच्या तिकीटवर उमेदवारी दाखल केली आहे. अर्जुनी मोरगाव मतदार संघात भाजपच्या जि.प.सदस्य किरण कांबळे यांनी शिवसेनेच्या तिकीटवर नामांकन दाखल केले. (जिल्हा प्रतिनिधी)