शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात भाजपा-सेनेचे एकला चलो रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:29 IST

राज्यात भाजप-सेना युती होण्यावर निवडणुका घोषीत होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर नाही हो म्हणता म्हणता भाजपा-सेनेची युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देस्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव : युतीधर्म केवळ नावापुरताच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात भाजप-सेना युती होण्यावर निवडणुका घोषीत होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर नाही हो म्हणता म्हणता भाजपा-सेनेची युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पातळीवरील मनभेद दूर झाले असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर न झाल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही समन्वय झाले नसल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांची साथ न घेता एकला चलो रे म्हणत उमेदवाराच्या प्रचाराला सुरूवात केल्याचे चित्र गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघात पाहयला मिळत आहे.गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १४ उमेदवार रिंगणात असून त्यांना चिन्ह वाटप सुध्दा झाले. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार असून कमीत कमीत दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी दिवसरात्र एक केल्याचे चित्र आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार जरी असले तरी खरी लढत राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये होणार स्पष्ट आहे.युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या तर आघाडीत राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. मात्र युतीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघावर आपला दावा केला त्यासाठीच उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उघडपणे उमेदवारीला विरोध करीत निवडणुकी दरम्यान प्रचारात सहभागी न होता घरी बसणार अशी भूमिका सुध्दा शिवसैनिकांनी घेतली होती. त्यामुळेच या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात सर्वच काही आॅलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. मातोश्रीवरुन आदेश झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म म्हणून वैर बाजुला ठेवून युतीच्या उमेदवाराचा प्रचारात सक्रीयपणे सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक भाजपा नेते प्रचारा दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनासोबत घेत नसल्याचे चित्र आहे.एवढेच नव्हे तर प्रचारासाठी वाहने, प्रचार साहित्य यांची सुध्दा गरज आहे का याची सुध्दा विचारणा करीत नसल्याची भावना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने व्यक्त केली. त्यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या निमंत्रणाची वाट न पाहता युतीधर्म म्हणून एकला चलो रे म्हणत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र प्रचारासाठी मतदारांमध्ये जातांना भाजपा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळे फिरत असल्याने मतदारांना सुध्दा खरोखरच युती झाली का असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या एकला चलो रे भूमिकेचा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोन विधानसभेसाठी सेनेचे सर्जिकल स्ट्राईकभंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळावी यासाठी दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. तर दुसरीकडे युती झाली असताना सुध्दा भाजपाचे स्थानिक नेते शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना महत्त्व देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सहा महिन्यांनी होणाºया विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून गोंदिया व भंडारा विधानसभेत जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली. या दोन्ही जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून त्यादृष्टीने सेनेच्या पदाधिकाºयांनी सर्जीकल स्ट्राईक सुरू केले आहे.उमेदवाराचीही अडचणभाजपा-सेना युतीचा उमेदवार म्हणून भाजपाचा उमेदवार दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र याला सोबत घेतले तर त्याला नाराजी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने उमेदवाराची चांगलीच अडचण होत आहे.

टॅग्स :BJPभाजपा