शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

‘त्या’ १७ रेतीघाटांचा खरेदीदारच नाही किमतीत २५ टक्क्याने कपात

By admin | Updated: May 11, 2014 00:22 IST

जिल्ह्यातील ४४ रेतीघाटांमधील १४ रेतीघाट जिल्हा खनिकर्म विभागाच्या चांगलेच अंगलट आले आहेत. तीन वेळा लिलाव केल्यानंतर आत पुन्हा चौथ्यांदाही ...

 रेतीघाट घेण्यास कंत्राटदार अनिच्छुक

गोंदिया : जिल्ह्यातील ४४ रेतीघाटांमधील १४ रेतीघाट जिल्हा खनिकर्म विभागाच्या चांगलेच अंगलट आले आहेत. तीन वेळा लिलाव केल्यानंतर आत पुन्हा चौथ्यांदाही यातील एकही घाट विकल्या गेलेला नाही. विशेष म्हणजे या घाटांच्या शासकिय किमतीपेक्षा २५ टक्के किंमत कमी करून २४ एप्रिल रोजी हा चौथा फेर लिलाव घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यामध्ये विभागाला ७८.२७ लाख रूपयांचा फटका सहन करावा लागला असता. जिल्ह्यात आजघडीला ४४ रेतीघाट असून त्यांना उपशाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार या रेतीघाटांचा लिलाव घेतला असता २७ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. मात्र १७ रेतीघाट घेण्यास एकही कंत्राटदार इच्छूक दिसून आला नाही व हे १७ रेतीघाट पडून राहिले. तीन वेळा या रेतीघाटांचा लिलाव घेण्यात आला मात्र कुणीही हे घाट घेतले नाही. शासनाकडे लिलावाविना पडून असलेल्या रेती घाटांमध्ये वैनगंगा नदीच्या पुजारीटोला (कासा), डांगोर्ली, महालगाव-१, चांदोरी खुर्द, मुंडीपार, वाघ नदीच्या सतोना (महादेव घाट), सिलापुर, घाट्टेमनी, ननसरी, मानेकसा, मुंडीपार, मरारटोला, गाढवी नदीच्या महागाव, वडेगाव बंध्या, चुलबंद नदीच्या पिपरी-१, ससेकरन नदीच्या देवपायली व भुदुटोला या घाटांचा समावेश आहे. खनिकर्म विभागाने ठरविलेल्या शासकीय किमतीनुसार या घाटांच्या लिलावातून विभागाला ३ कोटी १३ लाख ९ हजार २९९ रूपयांची आवक झाली असती. या घाटांचा लिलाव झाला असता तर सहाजिकच यांची किमत वाढली असती व त्याचा आकडा चार कोटींच्या घरात गेला असता. मात्र तीन वेळा हे घाट न विकल्याने विभागाला आता यांच्या शासकीय किमतीत २५ टक्के सूट देऊन त्यांचा लिलाव घेण्याची वेळ आली आहे. आता विभागाला हे १७ घाट २५ टक्के सुट देऊन २ कोटी ३४ लाख ८१ हजार ९७३ रूपयांत लिलावासाठी काढावे लागणार असून यात विभागाला ७८ लाख २७ हजार ३२६ रूपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. असे असतानाही या घाटांच्या लिलावासाठी जिल्हा खनिकर्म विभागाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता व त्यांच्या मंजुरीनुसार २४ एप्रिल रोजी या १७ रेतीघांटाचा फेर लिलाव घेण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे या चौध्या फेर लिलावातही एकही अर्ज या घाटांना घेण्यासाठी आला नाही. त्यामुळे हे १७ रेतीघाट पुन्हा पडून राहिले आहेत. विशेष म्हणजे ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत या घाटांचा लिलाव काढण्यात आला होता. म्हणजेच फक्त चारच महिने या घाटांच्या उपशाकरिता कंत्राटदाराला मिळणार होते. त्यातही हा पावसाळ््याचाच काळ असल्याने हे घाट घेणार्‍या कंत्राटदारांचे पैसे पाण्यातच गेले असते असे काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)