शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:50 IST

बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जांभुळटोला फाट्यावर शनिवारी (दि.२०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी प्रवाशांना उपचारार्थ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे१२ जण जखमी : आमगाव तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जांभुळटोला फाट्यावर शनिवारी (दि.२०) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी प्रवाशांना उपचारार्थ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, साखरीटोल्यावरुन गोंदियाकडे तिगाव मार्गे येणारी बस आणि सामोरुन येणाऱ्या स्कॉरपिओ यांच्यात जांभुळटोला फाट्यावर धडक झाली. यात बस मधील १२ प्रवाशी जखमी झाले.यापैकी ४ प्रवाशी गंभीर असून ८ प्रवाशी जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांमध्ये उर्मिला भोजराज वालदे (४८) रा.परसोडी, ता.देवरी, तारा हिरालाल कावळे (४१), गायत्री रामलाल पारधी (४१), कौसल्या केशव सोनवाने (६३) यांचा समावेश आहे.जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये निर्मला जनबंधू,मनोरमा साखरे, चंद्रकला दोनोडे, ममता जयेंद्र शिवणकर, तोरण पुजारी, रुपा पुराम,उत्पा भैसारे, मिरा पोरामल यांचा समावेश आहे.आमगाव पोलिसांनी बस व स्कॉरपिओ चालकाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आहे.गंभीर जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर इतर जखमींवर आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.सिटीस्कॅन बंद असल्याने नागरिकांचा संतापअंगणवाडी सेविकांच्या वाहनाला अपघात झाल्याने जखमी सेविकांना उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु येथील जखमींच्या उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने या संदर्भात बजरंग दलाने संताप व्यक्त करीत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. व्ही.पी. रूखमोडे यांच्याशी चर्चा करून त्यांना उपचार करण्यास बाध्य करण्यात आले. आंदोलनाची नेतृत्व मनोज मेंढे, अभिमन्यू चतरे, राजू महारवाडे, सुनिल कोहळे, राजेश करोशिया, प्रकाश शिवणकर, सागर सिक्का व इतर उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात