शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

सिव्हिल लाईन्समध्ये ‘द बर्निंग ट्रॅक्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:05 IST

ट्रॅक्टरमधील तणस वीज तारांना लागून तारांच्या आपसातील स्पार्कमुळे तणसाने पेट घेतला. शहरातील सिव्हील लाईन्समधील काका चौक परिसरात रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान ही घटना घडली. परिसरातील नागरिक व अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी घटना टळली.

ठळक मुद्देतणसाला लागली आग : वीज तारांच्या स्पार्कने घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ट्रॅक्टरमधील तणस वीज तारांना लागून तारांच्या आपसातील स्पार्कमुळे तणसाने पेट घेतला. शहरातील सिव्हील लाईन्समधील काका चौक परिसरात रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान ही घटना घडली. परिसरातील नागरिक व अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी घटना टळली. या घटनेनंतर लोकांनी ‘ द बर्निंग ट्रॅक्टर’ हा एकच शब्द तोंडातून काढला.सिव्हील लाईन्स परिसरातील राजू डोये यांच्याकडे तणसाने भरलेला ट्रॅक्टर आला होता. ट्रॅक्टरमध्ये तणस लबालब भरलेले असल्यामुळे तणस वीज तारांना लागत होते. यातच वीज तार आपसांत घासल्या गेल्या व त्यातून स्पार्क झाल्यामुळे ट्रॅक्टरमधील तणसाने पेट घेतला. रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान घडलेल्या घटनेत वेळीच लोकांनी आपल्या घरातून पाईप लावून तणसावर पाणी मारण्यास सुरूवात केली. तर लगेच ट्रॅक्टरचे इंजीन ट्रॉलीपासून वेगळे करण्यात आले. अग्निशमनही दाखल झाल्यानंतर त्यातूनही तणसावर पाणी मारण्यात आले. मात्र तणस आतल्या आत धगधगत असल्यामुळे लोकांनी हातांनी व फावड्याने तणस ट्रॉलीतून खाली पाडून आगीवर नियंत्रण मिळविले.ही घटना घडली ती बोळ अरूंद असून दोन्ही बाजूंनी घरे आहेत. शिवाय वीज ताराही खाली असल्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले नसते तर मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.तणसाला लागलेली आग विझविण्यासाठी दीपक कदम, नवरतन अग्रवाल, सागर कदम, गुड्डू कटरेसह नेचवाणी, थदानी, केडीया यांच्या परिवारातील सदस्यांनीही सहकार्य केले.

टॅग्स :fireआग