शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

हाजराफॉल परिसरात ‘बुलककार्ट’ सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 01:04 IST

नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या रुपात जिल्ह्यात सर्वात जास्त वेगाने वाढत असलेल्या हॉजराफॉल येथे नवनवीन

वन समितीचा उपक्रम : शहरी पर्यटकांसाठी कुतुहलाचे साधन सालेकसा : नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या रुपात जिल्ह्यात सर्वात जास्त वेगाने वाढत असलेल्या हॉजराफॉल येथे नवनवीन साहीत्यांची भर पडत चालली आहे. त्यातच आता पर्यटकांसाठी ‘बुलककार्ट’ची सोय करण्यात आल्याने शहरी पर्यटकांसाठी हे कुतूहलाचे साधन बनत आहे. परिणामी हाजराफॉल पर्यटकांची पहिली पसंती बनत चालले आहे. येथील नवयुवकांच्या नवनवीन प्रयोग व आकर्षक सोयी-सुविधा आणि खेळांच्या साहित्यांमुळे हाजराफॉल कात टाकत आहे. यातच वन व्यवस्थापन समितीच्या युवकांनी सचिव व वनरक्षक सुरेश रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात ‘बुलककार्ट’ सफारीची सोय केली आहे. त्यामुळे हाजराफॉलला येणारे पर्यटक विशेष करुन शहरी पर्यटक बैलबंडीवर बसून परिसर भ्रमणाचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी हे सध्या कुतूहलाचे विषय बनले आहे. बैल बंडीद्वारे हाजराफॉल परिसराचा आनंद लुटणाऱ्यांमध्ये शहरी पर्यटकांसह ग्रामीण भागातील पर्यटक सुद्धा सहभागी होत आहेत. यात युवा वर्ग व महिला वर्ग सुद्धा या साधनांचा उपयोग करीत आहेत. तर दुसरीकडे हा उपक्रम येथील युवकांसाठी रोजगार व अर्थार्जन करण्यासाठी त्यांच्या कार्यात भर टाकणारा ठरत आहे.सालेकसा -दरेकसा मार्गावर सालेकसा तालुका मुख्यालयापासून १० कि.मी. अंतरावर असलेला हाजराफॉल धबधबा ग्रामपंचायत कोसमतर्राच्या हद्दीत असून नवाटोला वन क्षेत्रात मोडतो. मुख्य मार्गाने नवाटोला पोहोचल्यानंतर १ कि.मी. पुढे गेल्यावर हाजराफॉलकडे जाणारा मार्ग असून मुख्य मार्ग लगतच प्रवेशद्वार आहे. या प्रवेश द्वारापासून १.५ कि.मी. अंतरावर हाजराफॉल धबधबा असून बाहेरुन आलेले पर्यटक प्रवेश द्वाराजवळ आपले वाहन पार्र्कींगकरुन बैलगाडीने निसर्गाचा आनंद घेत हाजराफॉल पर्यंत पोहोचू शकतात.तसेच आणखी इच्छा झाल्यास हाजराफॉलच्या लगत इतर भागात सुद्धा बैलगाडी द्वारे फेर फटका मारु शकतात. त्यामुळे त्यांना फिरण्याचा थकवा येणार नाही व डगमगत चालणाऱ्या बैलगाडीवर बसून डोलत जाणाऱ्यांना वेगळा आनंद मिळेल. बैलगाडीच्या सोयीमुळे एकीकडे युवकांना रोजगार व पर्यटकांना आनंद मिळेल तर दुसरीकडे हाजराफॉल परिसर प्रदुर्षण मुक्त राहण्यात मोठी मदत होऊन वाहनांचा कर्कश आवाज आणि नुकसानकारक धूरापासून मुक्तता होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सरपंचांनी दाखविली हिरवी झेंडी बैलगाडी सफारीची सुरुवात सरपंच पूजा वरखडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदिन उईके, सचिव व वनरक्षक सुरेश रहांगडाले, धनराज खांडवाये, तेजसिंग मडावी, रेवल उईके, गेंदलाल कामरकर, चुन्नीलाल मरस्कोल्हे, महागुलाल मडावी, पुस्तकला वट्टी, ओमकार दसरिया, यशोदा वाघाडे, सोमलाल कचलाम, नेहरू कोडवती आणि वन समितीचे युवक-युवती उपस्थित होते.