शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बुचाटोला, रूस्तमपूर झाले काश्मीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:36 IST

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काही क्षणातच गारांचा वर्षाव सुरू झाला. हा वर्षाव ४५ मिनिटे सतत सुरु राहिला व १०. १५ वाजता बंद झाला.

ठळक मुद्देगारांचे थर ६ ते ८ इंच : गहू आणि हरभऱ्याला सर्वाधिक फटका

ऑनलाईन लोकमतसुकडी (डाकराम) : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काही क्षणातच गारांचा वर्षाव सुरू झाला. हा वर्षाव ४५ मिनिटे सतत सुरु राहिला व १०. १५ वाजता बंद झाला. त्यामुळे जम्मू-काश्मिर व आसाममध्ये बर्फाचा वर्षाव होतो तशीच स्थिती बुचाटोला व रुस्तमपूरची झाली होती.जिकडे-तिकडे ६ ते ८ इंच तर कुठे १ फुटाच्या गारांचे थर संपूर्ण गावात व शेतामध्ये होते. अशाप्रकारे गारपिटीचा पाऊस कधी झाला नसल्याचे वयोवृद्धांनी सांगितले. या गारांच्या पावसाने बुचाटोला व रुस्तमपूर येथील शेतामधील भाजीपाला, हरभरा, वटाणा, गहू या पिकांचे नुकसान झाले. तर आंब्याचा मोहोर पूर्णपणे गळाला. गारपिटीमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले. रात्री बुचाटोला व रुस्तमपूर परिसर हा जम्मु कश्मीर दिसत होता. गावकऱ्यांना सकाळी उठल्यानंतर जिकडे तिकडे बर्फाची चादर दिसत होती. शेतामध्ये सुद्धा गारांचे थर जमा झाले होते.खंड विकास अधिकारी जावेद इनामदार, तहसीलदार संजय रामटेके, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, उपविभागीय अधिकारी गंगाराम तडपाळे यांना भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली. खंड विकास अधिकारी इनामदार यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. कश्मीर व आसामचे रूप बुचाटोला व रूस्तमपूर या गावांना आल्याचे त्यांना वाटले. जिकडे तिकडे गारांचे थर साचले होते. खडकी, डोंगरगाव, पिंडकेपार, मेंढा, इंदोरा, निमगाव या गावांमध्ये गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान बुचाटोला व रुस्तमपूर येथील शेतकऱ्यांचे झाले. धर्मदास जांभुळकर, ताराचंद जांभुळकर, तुलसीदास पाटील, युवराज पाटील, धर्मराज पाटील, राधेशाम पटले, राधेशाम पटले, पुष्पा जांभुळकर, उमाशंकर पटले, बलीदास जांभुळकर, ओंकारसिंह पटले व गावातील सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जि.प.सदस्य रजनी कुंभरे, जावेद इनामदार यांच्यासह सरपंच प्रभा जांभुळकर, सदस्य प्रेमलता पाटील, भाऊराव साखरे, युवराज पाटील, देवेंद्र जांभुळकर, तुलसीदास पाटील, धर्मदास जांभुळकर, गिरधारी पाटील यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

टॅग्स :Rainपाऊस