शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मधील युतीचा ब्रेकअप आठ दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:29 IST

एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही.

ठळक मुद्देनाना पटोले : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, जिल्हा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसची मागील चार वर्षांपासून गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असून भाजपची विचारधारा ही केव्हाच काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल अशी ग्वाही काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख माजी खा.नाना पटोले यांनी रविवारी (दि.२१) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, के.आर.शेन्डे, डॉ.नामदेव किरसान उपस्थित होते. जि.प.ची पोटनिवडणूक पार पडल्यानंतर गोंदिया जि.प.मध्ये असलेली काँग्रेस-भाजप अभद्र युती तोडण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी पक्ष श्रेष्ठींना सांगितले होते.मात्र पोटनिवडणूक होवून महिनाभराचा कालावधी लोटूनही युती तोडण्यात आली नसल्याचा प्रश्न माजी खा.नाना पटोले यांना केला असता त्यांनी ही अभद्र युती पक्षाला सुध्दा मान्य नाही.येत्या आठ दिवसात जि.प.तील अभद्र युती तोडण्यात येईल असे सांगितले.गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली. सरकारने यावर त्वरीत निर्णय न घेतल्यास भाजपच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात आणि गावात पाय ठेवू देणार नाही, या विरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार व कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते.मात्र यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन तीन वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.उलट शेतकरी थकबाकीदार झाल्याने त्यांना राष्टÑीयकृत बँकाकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांना १६ तास वीज देण्याची मागणीही पटोले यांनी केली.निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षावरआगामी विधानसभा निवडणूक आपण लढणार का असा प्रश्न नाना पटोले यांना केला असता सध्या आपल्यावर पक्षाने राज्याच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.त्यामुळे ती यशस्वीपणे पार पाडणे ही पहिली जबाबदारी आहे.पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यास आपण निर्णय घेवू असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेzpजिल्हा परिषद