लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रजेगाव घाट येथे नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सेल्फीच्या नादात नदीत बुडून मृत्यू झाला.रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. राजेश आसाराम मरसकोल्हे (रा.लक्ष्मीनगर) असे नदीत बुडालेल्या मुलाचे नाव आहे.सध्या श्रावण मास सुरू असून श्रावण मासात महादेवाला नदीच्या पाण्याने अभिषेक घालण्याची प्रथा आहे.यासाठी कावडीमध्ये नदीचे पाणी आणून मंदिरात महादेवाला जलाभिषेक घातला जातो.त्यानुसार,राजेश मरसकोल्हे परिसरातील सुमारे ३०-४० मुलांसोबत जवळील रजेगाव घाट येथे बाघ नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेला होता.एकदा आंघोळ करून झाल्यावर सेल्फीच्या नादात तो दुसऱ्यांदा गेला व पाय घसरून तो पाण्यात पडला.सध्या नदीला चांगलेच पाणी असून येथे डोह असल्याने त्याचा शोध लागला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून त्याचा शोध घेतला जात होता.
सेल्फीच्या नादात मुलगा नदीत बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 20:41 IST
रजेगाव घाट येथे नदीचे पाणी आणण्यासाठी कावड घेऊन गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सेल्फीच्या नादात नदीत बुडून मृत्यू झाला.रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. राजेश आसाराम मरसकोल्हे (रा.लक्ष्मीनगर) असे नदीत बुडालेल्या मुलाचे नाव आहे.
सेल्फीच्या नादात मुलगा नदीत बुडाला
ठळक मुद्देरजेगाव घाट येथील घटना : कावड आणण्यासाठी गेला होता