शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्ट्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

‘लोकमत’ने देशी कट्ट्यांच्या विक्रीसंदर्भात वृत्त प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंदे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक बबन आव्हाड यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करीत आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शहरात देशी कट्ट्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे खळबळजनक वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि.२८) प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेऊन देशी कट्टा विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्ट्यासह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने देशी कट्ट्यांच्या विक्रीसंदर्भात वृत्त प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंदे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक बबन आव्हाड यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करीत आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले. यात रविवारी (दि.२८) स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार भुवनलाल देशमुख, अर्जुन कावळे, पोलीस नायक कोडापे व विनोद गौतम हे पोलीस वाहनाने (क्रमांक एमएच ३५-डी ५६५) शहर ठाण्याच्या हद्दीत होळी बंदोबस्त, गुन्हेगार शोध व पेट्रोलिंग करीत होते. अशात त्यांना मपूर उपाध्याय विनापरवाना पिस्टल बाळगून असून, सध्या लालपहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा आहे, अशी माहिती मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आव्हाड यांना मााहिती देऊन ते  निघाले व सापळा रचून  मपूर ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (१९, रा. मुर्री लालपहाडी) याला ताब्यात घेतले.  पिस्टलसंदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने मयूर प्रेमलाल गजभिये (रा.कुंभारेनगर)  याला दिल्याचे व ती पिस्टल धम्मदीप गजभिये (रा. कुंभारेनगर) याच्या मालकीची असल्याचे सांगितले. यावरून त्याला ताब्यात घेऊन जात असताना रस्त्याने जाणारा मयूर प्रेमलाल गजभिये दिसला असता त्याला पकडून तपासणी केल्यावर त्याच्या कंबरेला पॅन्टमध्ये मागच्या बाजूला देशी पिस्तूल आढळली. ती पिस्टल ३५ हजार रुपये किमतीची आहे.   या प्रकरणात मयूूर गजभिये व मपूर उपाध्याय लालपहाडी यांना अटक करण्यात आली आहे, तर  आरोपी धम्मदीप गजभिये फरार झाला आहे. शहर पोलिसांत पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी