शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

बोनसचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:26 PM

मागील दोन तीन महिन्यांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर शनिवारी (दि.२३) संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील शेंदूरवाफा येथे आयोजित एका कार्यक्रमात धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देव्यापारी फायदा घेण्याच्या तयारीत : ६० हजार शेतकºयांनी केली धानाची विक्री

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन तीन महिन्यांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकºयांची प्रतीक्षा अखेर शनिवारी (दि.२३) संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील शेंदूरवाफा येथे आयोजित एका कार्यक्रमात धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. मात्र या बोनसचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील मोजक्याच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर या निर्णयाचा लाभ काही व्यापारी घेण्याच्या तयारीत आहेत.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात धान खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशने २३ फेब्रुवारीपर्यंत १३ लाख ४५ हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ५ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत २२५ कोटी रुपये असून ४२ हजार शेतकºयांनी धानाची विक्री केली आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर जवळपास १२ ते १५ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. त्यामुळे तेवढ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनसचा लाभ मिळेल हे स्पष्ट आहे. शिवाय यानंतर काही शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्यात त्यात वाढ होवू शकते.मात्र सध्या स्थितीत शेतकऱ्यांकडे फार कमी प्रमाणात धान शिल्लक आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर फारशी आवक राहण्याची शक्यता कमी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांचा विचार केल्यास हा आकडा फार कमी आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार शेतकरी असून त्यातुलनेत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहता फार कमी आहे.आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची संख्या अद्यापही एक लाखावर पोहचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अधिक धानाची विक्री केल्याचे चित्र आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. परिणामी बोनसचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.बोनस उशिरा जाहीर केल्याचाही फटकाशासनाने यंदा अ दर्जाच्या धानाला १७७० तर सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव दिला. तर लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या सरकारने धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्र शासनावर सुध्दा शेतकऱ्यांकडून दबाब वाढला होता. दरवर्षी धानाला सुरूवातीला बोनस जाहीर केला जात होता. मात्र यंदा सरकारने बोनस जाहीर करण्यास उशीर केला. धानाला ५०० रुपये बोनस जाहीर करुन सरकारने शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र बºयाच शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केल्याने बोनसचा लाभ या शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही हे स्पष्ट आहे.व्यापाऱ्यांकडे मोठा साठाधानाला आज नाही तर उद्या बोनस जाहीर होईल ही अपेक्षा होतीच. त्यामुळे बºयाच खासगी व्यापाºयांनी शेतकºयांकडून कमी दराने धानाची खरेदी केली होती. त्यामुळे सध्या स्थितीत खासगी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धानाचा साठा आहे. काही व्यापारी आता १५०० ते १६०० रुपये क्विंटलने खरेदी केलेला धान शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर विक्री करुन बोनसचा फायदा मिळवून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.घोषणा होताच पोस्टरबाजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला ५०० रुपये क्विंटल बोनस जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी सोशल मीडियावर आणि विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्टर तयार करुन श्रेय लाटण्यास सुरूवात केली. त्यामुळे या पोस्टरबाजांची सुध्दा सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होती.छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या तुलनेत भाव कमीचलगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव दिला जात आहे. तर त्यातुलनेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिला जाणारा हमीभाव कमीच आहे. सध्या महाराष्ट्रात धानाला १७५० रुपये हमीभाव आणि ५०० रुपये बोनस असा एकूण २२५० रुपये क्विंटल भाव मिळणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या तुलनेत २५० रुपये हमीभाव कमीच आहे. तर लागवड खर्चाचा विचार केल्यास शेतकऱ्यांना बोनस मिळाल्यानंतर हातात किती पैसे शिल्लक राहणार याचा सुध्दा विचार करावा लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी