पत्रपरिषदेत आरोप : माजी संचालकांचे पुरावेअर्जुनी-मोरगाव : स्थानिक तालुका खरेदी विक्री समितीमध्ये ज्यांच्याजवळ सात-बाराचा उतारा नाही, शेती नाही, अल्पवयीन आहेत अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याची माहिती यशवंत परशुरामकर, राकेश लंजे यांनी पत्रपरिषदेत दिली.खरेदी विक्री समितीमध्ये यावर्षी नवीन उपविधी तयार करण्यात आली. या उपविधीमध्ये जुन्या भागधारकांविषयी कुठलाच उल्लेख नाही. केवळ नवीन भागधारकांनाच लागू होईल असा उल्लेख आहे. सुमारे ३ हजार जुने सभासद कमी करण्यात आले आहेत. कमी केल्याची कारणे नमूद नाहीत. अनेक नवीन बोगस सभासदांची नोंदणी करण्यात आली. सभासदत्वासाठी शेती व सात-बाराच्या उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे. मात्र सभाद क्र.२२९२, २८९२ यांच्याकडे शेती नाही व सातबाराचा उतारा नाही. सभासदत्व व मतदाराच्या पात्रतेसाठी १८ वर्षे वय असणे बंधनकाक असतानाही सभासद क्र. १०१८चे वय १४ वर्षे आहे व त्याचे नाव मतदार यादीत आहे.या संख्येत कारभार हा बहुतांशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. संचालक मंडळाला नवीन भरती प्रक्रि येशी देणे-घेणे नाही. अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना संस्थेतील काळेबेरे माहिती आहेत. नवीन भरती प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या पाठीमागील अडचणी वाढू शकतात. या भितीपोटी निकृत झालेल्या कर्मचाऱ्यांकडूनच संख्येचे काम करुन घेतले जात आहे. रबी हंगामातील धान पीक घेण्याचे प्रमाण एकरी १५ क्विंटल आहे. कृषी आढावा घेतल्यास तालुक्यात रबी हंगामात १ लाख क्विंटल उत्पादन होऊन आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी यायला पाहिजे. मात्र या संस्थेमार्फत दीड लाख क्विंटल धान खरेदी कशी होते असा प्रश्न उपस्थित केला. खरेदी विक्री संस्थेचे गोदाम भाड्याने दिले जाते व संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचे गोदाम या संस्थेतील धान ठेवण्यासाठी भाड्याने घेतले जातात. असा गोप्यस्पोट परशुरामकर व लंजे यांनी केला. यावेळी अशोक चांडक, प्रकाश शहारे, नवीन नशिने, परेश उजवणे, किशोर शहारे, सर्वेश भुतडा, नेताजी पाऊलझगडे, भोजराज रहिले, राजू पालीवाल, बालू बडवाईक, भाऊराव खोब्रागडे, परसराम शेंडे, मुकेश जायस्वाल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)रस्त्यांवरच साचत आहे पावसाचे पाणीगोंदिया : शहरातील रस्त्यांचे बांधकाम नियोजन शून्य असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचत असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी हे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. यामुळे मात्र नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करणे डोकेदुखीचे ठरत आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देत दुरूस्ती करण्याची गरज आहे.
खरेदी विक्री समितीत बोगस मतदार !
By admin | Updated: August 15, 2015 01:43 IST