लोकमत समूह, सालेकसा पोलीस स्टेशन, मोक्षधाम सेवा समिती सालेकसा, लोकमत सखी मंच सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य आहे. रक्तदान केल्याने आपल्या शरीराला त्याचा लाभ मिळतो आणि आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना प्राण गमावावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोना संकट काळात राज्यात रक्ताचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. अशा संकटात गरजूंना वेळीच रक्त उपलब्ध व्हावे यासाठी लोकमत समूहाने रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान हे महादान असून, प्रत्येक सुदृढ महिला, पुरुषांनी रक्तदान केले पाहिजे. मग चला या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन गरजूंना मदत करूया. इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी लोकमत प्रतिनिधी विजय मानकर ९८२३७४९१४४, लोकमत समाचार प्रतिनिधी गणेश भदाडे ७७४५८२३५९१, सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले, मोक्षधाम सेवा समिती अध्यक्ष संदीप दुबे, सखी मंच संयोजिका किरण मोरे यांच्याशी संपर्क साधावा.
सालेकसात उद्या रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST