लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त २ जुलै रोजी सकाळी १० वाजता पासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते.बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिली आहे. येथील शासकीय ब्लड बँकेत सुद्धा नेहमीच रक्ताची टंचाई असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेत ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्य तसेच ‘लोकमत’ वाचकांनी व विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलींद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी बाल मंच जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) व सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्स्ना सहारे (९४२१०६४७२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.
बाबूजींच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर २ जुलै रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST