शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गोंदियात भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 22:04 IST

भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचारी असे विविध नारे लावत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. गोंदिया शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा गांधी चौकात पोहचला. या चौकात निदर्शने करून मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चा सुरू झाला त्यावेळी शहर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देमोर्चा काढून लावले नारे : राज्यभरातच वसुली अभियान होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी आरोप करीत त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. या लेटरबाॅम्बनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणावर महाराष्ट्र सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. तसेच या विरोधात रविवारी सकाळी शहरातील जयस्तंभ चाैकात निदर्शने करण्यात आली.  भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचारी असे विविध नारे लावत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. गोंदिया शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा गांधी चौकात पोहचला. या चौकात निदर्शने करून मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चा सुरू झाला त्यावेळी शहर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता. यावर पत्रकारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी याला दुजोरा देताना सांगितले की भाजपच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी माेर्चा अडविला होता. कोविडची साथ सुरू असल्यामुळे माेर्चा काढू नये असे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु यात चर्चा करून मार्ग काढण्यात आल्याचे सांगितले. या मोर्चात माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नगरसेवक राजकुमार कुथे, संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे व इतरांचा समावेश होता.

 

टॅग्स :BJPभाजपाMorchaमोर्चा