शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडे बहुमत मग राष्ट्रवादी काँग्रेससह युती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज होती. भाजपचे २६ सदस्य होते, दोन अपक्ष सदस्य भाजपसोबत आल्याने त्यांना जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य होते. पण, यानंतरही  वेळेवर कोणता धोका नको म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी संघटनेच्या चार सदस्यांना सोबत घेतले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटना आणि अपक्ष मिळून हा आकडा ४० वर पोहोचला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बाहुबली या हिंदी चित्रपटातील बाहुबलीने कट्टपा को क्यू मारा, हा विषय तेव्हा खूप  चर्चेचा झाला होता. यावरून बरेच विनोददेखील निर्माण झाले होते. असेच चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात  निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी दोन अपक्ष सदस्यांना घेऊन भाजपला बहुमताने सत्ता स्थापन  करणे सहज शक्य होते. मग, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत का घेतले, या प्रश्नाने सध्या भाजप नेत्यांना बेजार केले आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते तसेच कुणीच कुणाचा वैरी नसतो, हेदेखील बरेचदा सिद्ध झाले आहे. सत्तेच्या समीकरणासाठी राजकारणी वेळेवर कसलीही तडजोड करू शकतात. याचाच परिचय मंगळवारी जिल्हावासीयांना जिल्हा  परिषदेत सत्ता स्थापनेप्रसंगी आला. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज होती. भाजपचे २६ सदस्य होते, दोन अपक्ष सदस्य भाजपसोबत आल्याने त्यांना जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य होते. पण, यानंतरही  वेळेवर कोणता धोका नको म्हणून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी संघटनेच्या चार सदस्यांना सोबत घेतले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटना आणि अपक्ष मिळून हा आकडा ४० वर पोहोचला. एकीकडे भाजप नेते सोमवारी रात्रभर सत्तेचे  समीकरण जुळवत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीलासुद्धा सोबत घेत असल्याची माहिती कुणालाच नव्हती. मंगळवारी सकाळी  अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर यांनी नामाकंन दाखल केल्यावर भाजप व राष्ट्रवादीच्या युतीचे पिक्चर पुढे आले. या युतीची माहिती भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच  वरिष्ठ नेत्यांनासुद्धा नव्हती. अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर अनेकांच्या मुखात केवळ एकच प्रश्न होता, तो म्हणजे  भाजपकडे अपक्षांना घेऊन बहुमत होत असतानाही मग राष्ट्रवादी काँग्रेसह युती का, हाच प्रश्न होता. तर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातसुद्धा  सध्या हाच विषय चर्चेचा आहे. 

...तर चित्र असते वेगळे जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा, याला घेऊन भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला होता. त्यातच एका नेत्याने आठ सदस्यांना घेऊन वेळेवर वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केल्याची कुजबुज होती. त्यामुळे तसे झाल्यास भाजपला सर्वात मोठा पक्ष असूनही जि.प.मध्ये सत्तेबाहेर राहावे लागले असते. हा धाेका निर्माण होऊ नये, यासाठीच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांना सोबत घेतल्याचे बोलले जाते.

या युतीला काय नाव देणार ?जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने यापूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेसने युतीधर्म नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारून भाजपसोबत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अभद्र युती केल्याचा आरोप काँग्रेसवर केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसदेखील भाजपसोबत गेला. त्यामुळे आता ही युती भद्र की अभद्र अशी टीका होत आहे. भाजपसोबत जाण्याचे पाऊल का?जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच पाण्यात पाहण्याचे काम केले. मागील जि.प. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानासुद्धा केवळ बंगाल आणि गल्लीच्या वादात काँग्रेसने राष्ट्रवादीसह सत्ता स्थापन न करता भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. तर हेच चित्र पंचायत समित्यांमध्येसुद्धा पाहायला मिळाले. तर, काँग्रेसने भंडाऱ्यात भाजपसोबत जाण्याची खेळी खेळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेवर धोका नको म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस