शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात असंतुष्टांचा स्फोट

By admin | Updated: January 31, 2015 23:21 IST

भारतीय जनता पक्षात एकेकाळी सत्तेचे केंद्र ठरणाऱ्या आमगावात राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपातील शिवणकर गटाच्या असंतुष्ट बंडखोरांकडून त्यासाठी रविवारी

आज शक्तिप्रदर्शन : शिवणकर राकांकडून विधान परिषदेवर?आमगाव : भारतीय जनता पक्षात एकेकाळी सत्तेचे केंद्र ठरणाऱ्या आमगावात राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपातील शिवणकर गटाच्या असंतुष्ट बंडखोरांकडून त्यासाठी रविवारी (दि.१) येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात शक्तिप्रदर्शन होणार आहे.मागील एक दशकापासून चालत असलेली भाजपातील अंतर्गत वर्चस्वाची लढाई आता विकोपाला पोहोचली आहे. पक्षातील असंतुष्ट शिवणकर गट आता शक्तीप्रदर्शन करून भाजपातून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि विजय शिवणकरांना विधानस परिषदेवर घेतले जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. पूर्व विदर्भात भारतीय जनता पक्षात अनेक नेत्यांनी संघर्ष करीत पक्षबांधणीसाठी परिश्रम घेतले. आज पूर्व विदर्भ भाजपाचा गड म्हणून गाजत आहे. विरोधी व सत्तापक्षात नेत्यांनी आपल्या कामाचा दरारा निर्माण केला. परंतु पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व दिल्याने स्वत:च्या राजकारणाकरीता नेत्यांनी धावपळ सुरू केली. शिवणकरांनी जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. मात्र सत्ता हाती असतानाही त्यांना कुरघोडीच्या राजकारणाला तोंड द्यावे लागत आहे. प्रा.महादेवराव शिवणकर व विजय शिवणकर यांच्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका बजावल्याच्या तक्रारी पुढे आहेत. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शिवणकरांनी डावलल्याचे कारण पुढे करून दोन दिवसांपूर्वी झालेल्या आमगाव तालुका भाजपच्या बैठकीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आणि येथूनच असंतोषाची ठिणगी भडकली. यातून असंतुष्ट शिवणकर गटाने शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरविले. (शहर प्रतिनिधी)