शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

भाजपने केले विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द, घर वापसी होणार

By अंकुश गुंडावार | Updated: October 6, 2024 17:45 IST

सोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांचेही निलंबन रद्द

गोंदिया: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विनोद अग्रवाल यांना डावलून भाजपने माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे विनोद यांनी भाजपला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. भाजपने त्यांच्यासह इतर १२ जणांवर बंडखोरीचा ठपका ठेवीत पक्षातून निलंबित केले होते. पण हे निलंबन तब्बल पाच वर्षांनंतर रविवारी (दि. ६) रद्द केले. त्यामुळे त्यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि.६) पत्र काढून आ. विनोद अग्रवाल यांच्यासह एकूण १२ जणांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे पत्र काढले आहे. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये २० दिवसांपूर्वी घरवापसी केली. त्यानंतरच आ. विनाेद अग्रवाल यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. तर आ. अग्रवाल यांच्या भाजप नेत्यांसह गाठीभेटी वाढल्या होत्या. तर त्यांनी चावी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दोनदा सभा घेऊन भाजपमध्ये परतावे की याबाबत कल जाणून घेतला होता. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये घरवापसी करतील अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनाेद अग्रवाल यांचे निलंबन मागे घेतल्याचे पत्र काढल्याने घरवापसीच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांची अधिकृतपणे घरवापसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवारी विनोद अग्रवाल यांनाच

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात तीन संस्थेच्या माध्यमातून तीन ते चार सर्वे केले त्यात आ. विनोद अग्रवाल यांचे नाव पुढे आल्याची माहिती आहे. त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर सखोल चर्चा करून गोंदिया विधानसभेतून आ. विनाेद अग्रवाल यांनाच भाजपकडून रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलल्या जाते. यासाठीच त्यांचे निलंबन रद्द करून एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे.

यांचेही निलंबन केले रद्दआ. विनोद अग्रवाल यांच्यासह तत्कालीन भाजप जिल्हा सरचिटणीस भाऊराव उके, मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, अमित बुद्धे, मुनेश रहांगडाले, रामराजे रवरे, शिव शर्मा, घनश्याम पानतवने, धर्मपाल अग्रवाल, दीपक बोबडे, नीतू बिरीया, शैलेश सोनवाने, कमलेश लिल्हारे आदी पदाधिकारी गेले होते. यासर्वांवर पक्षांने निलंबनाची कारवाई केली होती. यासर्वांचे निलंबनसुद्धा रद्द करण्यात असल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाBJPभाजपा