शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमीच; स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास प्रशासन अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:25 IST

हजार मुलांमागे केवळ ९५६ मुली : जनजागृतीचा प्रभाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी होत आहे. एक हजार मुलांमागे ९५६ मुली हे प्रमाण आहे. यामुळे सामाजिक असंतुलन होण्याची चिन्हे दिसत आहेत. नागरिकांमध्ये बेटी बचाव मोहिमेचा फारसा प्रभाव होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलींचा जन्मदर वाढण्याऐवजी कमी होत चालल्याने हा चिंतेचा विषय होत चालला आहे.

वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा १९९४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणे गुन्हा आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे, हा यामागील उद्देश होता. त्यामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जात असल्याचा कांगावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. सर्वच यंत्रणांकडून 'बेटी बचाओ व बेटी पढाओ' असा नारा दिला जात असला तरी गोंदियात मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात हजार मुलांमध्ये ४४ मुलांना जोडीदार मिळण्याची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणीला कायद्यानुसार बंदी आहे. असे असताना मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल तर गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी जिल्ह्यात होते की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. मुलींचा जन्मदर घटल्यामुळे 'बेटी बचाओ' चा नारा केवळ नाममात्र ठरत असल्याचे चित्र आहे. 

याकडे होतेय दुर्लक्ष मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे सांगणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर लिंबू टिचून स्त्रीभ्रूणहत्या होत असताना आरोग्य विभागाची गेल्या तीन-चार वर्षांत एकही कारवाई नाही. गोंदियात गर्भनिदान आणि मध्य प्रदेशात गर्भपात केले जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असतानाही शासकीय यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

"मुलींच्या घटत्या जन्मदरावरून अजूनही मुलीसंदर्भात मानसिकता बदलेली नाही. अजूनही मुलगा-मुलगी असा भेद केला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजाने अधिक जागृत होऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची व व्यापक जनजागृती करण्याची खरी गरज आहे." - सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया