शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

जिल्ह्यातील बिडी उद्योग मोडकळीस!

By admin | Updated: November 4, 2014 22:42 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांपैकी एक असलेला बिडी उद्योग पुर्णत: मोडकळीस आला असून, या व्यवसायात गुंतलेल्या हजारो बिडी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नामांकित बिडी कंपन्यांनी त्यांचे जिल्ह्यातील कारखाने बंद केले असून, मजुरांसह कारखान्यातील कर्मचारी आणि कंत्राटदारांवरही आर्थिक संकट ओढवले आहे.गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात बिडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात सी.जे. पटेल अ‍ॅन्ड कंपनी, गोंदिया, मोहनलाल हरगोविंद दास (जलबपूर) आणि पी.के. पोरवाल कंपनी (कामठी) या तीन नामांकित कंपन्याचे बिडी कारखाने होते. बहुतेक सर्व तालुक्यांच्या ठिकाणी त्यांचे स्टॉक असायचे. गावागावात या कंपन्यांनी कंत्राटदार नियुक्त केले होते. मजुरांना तेंदुपाने, तंबाखू आणि सुताचा पुरवठा करायचा व मजुरांनी तयार केलेल्या बिड्या घेऊ न त्या कारखान्यात पुरवायच्या, असा हा उद्योग दोन्ही जिल्ह्याच्या शेकडो गावात पसरला होता. या मजुरांना एक हजार बिड्यांसाठी २५ ते ४० रू पयांपर्यंत मजूरी दिली जायची. मोठया कंपन्याचे बंदर बॅग, संजीव आणि असेच अनेक ब्रँन्ड होते. स्थानिक पातळीवरही गेंडा, टायगर, चिता या नावाने काही काही लघुउद्योगही उभे झाले होते. ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंब बिड्या वळण्याच्या व्यवसायात असायचे. यातूनच त्या कुटुंबाचा आर्थिक गाडा रेटला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षात बिडी उद्योग पूर्णत: मोडकळीस आला आहे. पोरवाल, सी.जे. पटेल, सोहनलालसारख्या कंपन्यांनी त्यांचे कारखाने आणि स्टॉक बंद केले आहेत. परिणामी, कारखान्यात कार्यरत कर्मचारी, व्यवस्थापक आणि कंत्राटदारही रस्त्यावर आले आहेत. कारखानेच बंद झाल्याने हजारो मजुरांवरही आर्थिक संकट कोसळले आहे.तेंदूपत्याच्या कमाईत नक्षलवाद्यांचा हिस्सा ?तेंदूपत्ता हा बिडी व्यवसायातील महत्वाचा घटक आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता मिळत असून, याच जिल्ह्याच्या जंगलव्याप्त भागात नक्षलवादी चळवळ फोफावली आहे. तेंदूपाने तोडणाऱ्या कामगारांनी मजुरी वाढविणे, तेंदू ठेकेदारांकडून खंडणी वसूल करणे, त्यांचे ट्रक जाळणे, प्रसंगी मारहाण करणे अशा मार्गाचा नक्षलवाद्यांनी अवलंब करणे सुरू केले आहे. नक्षल्यांची नाराजी ओढवून कोणत्याही तेंदूपत्ता ठेकेदार जंगलातून पाने गोळा करू शकत नाही किंवा वाहतूक करू शकत नाही. तेंदूपत्ताच्या व्यवसायातील कमाईतून बराचसा वाटा नक्षलवाद्यांना द्यावा लागत असल्याने कंत्राटदारांनीही तेंदूपत्याचे भाव वाढविले. परिणामी, बिडी कारखानदारांना चढ्या दरात तेंदूपत्ता विकत घ्यावा लागतो. इतके सारे करुनही बिड्यांना मागणी नसल्याने तसेच भाव मिळत नसल्याने या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.मजुरांची फरफटबिडी उद्योगावर अवकळा आल्याने आणि कंपन्यांतील उद्योग गुंडाळल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांची अक्षरश: फरपट सुरु आहे. बिड्या वळण्याशिवाय दुसरे काम जमत नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतेक मजूर आता रोजगार हमी योजना आणि अशाच मोलमजुरीच्या कामावर जात आहे. तेंदूपत्ताचे पुडे करणे, पाने कापणे, बिड्या वळणे, कट्टे किंवा चुंगळ््या तयार करणे, ही कामे बैठ्या स्वरुपाची असल्याने शेकडो मजुरांना मणक्याचे आजार जडले आहेत. शिवाय सातत्याने तंबाखूच्या संपर्कात असल्याने अनेक जण फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. बिडी मजुरांसाठी भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि भंडारा येथे कामगार खात्याचे रुग्णालय असले तरी, त्याचा कोणताही लाभ मजुरांना होत नाही. पुर्वी बिड्या वळून कुटूंबाचा गाडा रेटणारे अनेक मजूर आता भीक मागताना दिसतात. बिडी उद्योग बंद पडल्यानंतर या मजुरांसाठी दुर्देवाने शासन अथवा राजकीय पुढाऱ्यांनी अन्य कोणतेही उद्योग उभारले नसल्याने एक मोठा वर्ग आज हलाखीचे जीवन जगतो आहे. (शहर प्रतिनिधी)