शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 10:48 IST

वडसा-कोहमारा राज्यमार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे.

ठळक मुद्दे वडसा-कोहमारा राज्यमार्गावर अर्जुनी मोरगाव येथील घटना...

गोंदिया : वडसा कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव टी-पॉइंटवर भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना बुधवारच्या सकाळी साडे आठ वाजता दरम्यान घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दोघांनाही स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सुजुकी सेलेरियो एम एच ३५ एजी ४२५१ या चारचाकी वाहनाने जनबंधू कुटुंबीय खामखुऱ्यावरून गोंदियाला जात होते. याचवेळी मोरगाव टी-पॉइंटवर महागावकडून समीर माधव नाकाडे  (२०), विशाल देविदास नाकाडे  (१८) रा.ताडगाव हे  एम एच ३५ एक्स ६२१८ या दुचाकीने ताडगावला परत जात होते. दोन्ही वाहने आपापल्या दिशेने भरधाव वेगाने  येत होती. दरम्यान, राज्यमार्गावरील मोरगाव चौकात दोन्ही वाहनांची धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीला चारचाकी कारने सुमारे ७० फूट पर्यंत फरफटत नेले. या दुर्घटनेत दुचाकीस्वारांची स्थिती गंभीर आहे. दोघांनाही स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले विशाल नाकाडे यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती प्राप्त आहे. कारमध्ये असलेले  जनबंधू कुटुंबीय सुरक्षित आहेत. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान चौकामध्ये शेकडोंच्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती.

माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम हे चमूसह घटनास्थळी दाखल झाले. अर्जुनी मोरगाव पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbikeबाईकcarकार