लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याला प्रतिबंध लावण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी कारवाई आणि पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कलम १४४ चे मनाई आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे.गोंदिया उपविभागात विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घातली आहे. तसेच चेहºयावर कायम मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्याला वस्तूंचे दरपत्रक लावणे बंधनकारक केले असून मॉर्निंग वॉक, इव्हीनिंग वॉक व विनाकारण घराबाहेर फिरण्यास गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वंदना सवरंगपते यांनी एका आदेशाद्वारे मनाई केली आहे.रस्ते, बाजार रुग्णालय व कार्यालय इत्यादी ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळून आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.मास्कचा वापर अनिवार्यसार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे पूर्ण झाकलेले नसलेली व्यक्ती आढळून आल्यास शंभर रु पये दंड व पुन्हा हे गैरकृत्य केल्याचे आढळून आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानदार, फळ, भाजीपाला विक्रते, अन्य सर्व जीवनावश्यक वस्तू विक्र ेते व ग्राहक हे सामाजिक अंतर ठेवून खरेदी विक्र ी करताना आढळून न आल्यास ग्राहक व्यक्तीला उल्लंघन केले म्हणून शंभर रुपये दंड व दुसºयांदा आढळून आल्यास फौजदारी कारवाई, आस्थापना मालकास, दुकानदारास, विक्र ेत्यास एक हजार रुपये दंड, तसे पुन्हा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास दोन हजार रुपये दंड व दुसºयांदा आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.मॉर्निंग व ईव्हीनिंग वॉकवर बंदीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र यानंतरही मॉर्निंग आणि ईव्हीनिंग वॉक करण्याच्या नावावर घराबाहेर पडत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी या दोन्ही कारणाने बाहेर फिरण्यास निघालेल्या व्यक्तीस ५०० रुपये दंड व दुसºयांदा आढळून आल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. वरील आदेशाचे पालन न करणाºया व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार शिक्षा करण्यात येईल. अशा प्रकारचे गैरकृत्य करून कायद्याचे उल्लंघन करणाºया व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आवश्यकतेनुसार फोटोग्राफी किंवा व्हीडिओग्राफी करावी. असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वंदना सवरंगपते यांनी दिले आहे.
खबरदार आता सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याला प्रतिबंध लावण्यासाठी शासन ...
खबरदार आता सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर
ठळक मुद्देफौजदारी कारवाई व दंड होणार : जिल्हा प्रशासनाचा निर्णय