शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा शेकडो युवक घेताहेत लाभ

By admin | Updated: June 6, 2014 00:04 IST

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही.

अर्जुनी/मोरगाव : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही. मात्र पोलीस भरतीमधील शारीरिक क्षमता चाचणीत आपण नक्कीच उत्तीर्ण होऊ असा विश्‍वास आता शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना वाटत आहे.या बेरोजगार युवकांसाठी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात नि:शुल्क शारीरिक प्रशिक्षण दिले जात आहे. स्पर्धेत टिकून राहावे यासाठीचा अभ्यास तथा पोलीस व सेनेमध्ये नोकरी मिळण्यासाठी ते विविध कसरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील मुलामुलींना पोलीस किंवा सेनेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी सन २00९ पासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा हा उपक्रम राबविला जात असून त्याचे आता फलित होण्याची आशा निर्माण झाली आहे.पोलीस हवालदार रमेश खंडाते हे पूर्वी १९९३-९४ या कालावधीत भंडारा-गोंदिया पोलीस मुख्यालयात कवायत निर्देशक म्हणून काम करीत होते. पोलीस विभागात नव्याने नियुक्त झालेल्या जवानांना सुध्दा त्यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. खंडाते हे सन २00९ ला अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये बदलून आले. तेव्हापासून त्यांनी तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरूण/तरूणींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे या सामाजिक भावनेतून त्यांनी प्रशिक्षण शिबीर सुरू करून शेकडो तरूण/तरुणींना प्रशिक्षित केले आहे. आज  त्यांच्या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील ५0 ते ६0 मुले/मुली पोलीस विभाग, एसआरपी, सीआरपी, बीएसएफमध्ये नोकरीला लागले आहेत. सध्या पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाला आणखीच महत्व आले आहे. आपल्या पोलीस स्टेशनची नियमित ड्युटी कार्य आटोपून खंडाते हे सामाजिक दायित्व ठेवून तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी अर्जुनी/मोरगावचे पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली असता, पोलीस हवालदार रमेश खंडाते यांच्या या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देवून त्यांना प्रोत्साहित करून सदर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना करून आपणही स्वत: मार्गदर्शन केले. राजमाने तथा अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांचे मार्गदर्शनात खंडाते हे शेकडो मुला/मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम, दोन टप्यातील रनिंग, गोळा फेक, लॉग जम्प, पुलप्स अशा विविध कसरतीचे प्रशिक्षण दिले जाते. या कामासाठी पोलीस हवालदार दिवाकर शहारे सुध्दा त्यांना मदत करीत असल्याचे खंडाते यांनी सांगितले.  या कसरतीच्या प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारीसुध्दा पोलीस हवालदार अंबादास थोरात करून घेत आहे. हे सर्व सामाजिक उपक्रम आपण वरिष्ठांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण करीत असतो, असेही खंडाते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)