शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गरजूंना योजनेचा लाभ मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 9:51 PM

केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्र म देशभरात राबविण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात केला. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्र म देशभरात राबविण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात केला. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात रविवारी (दि.२३) आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते होते. या वेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरीश बैजल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमादे खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, नगरसेविका भावना कदम उपस्थित होते.बडोले म्हणाले, ही योजना नि:शुल्क आहे. यात केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरणार आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रती वर्ष प्रती कुटूंब रु पये १ लाख ५० हजार रुपये एवढ्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार घेता येईल. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा रु .२.५० हजार रुपये लक्ष एवढी आहे. या योजनेअंतर्गत सध्या शासकीय रु ग्णालयामधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करु न देण्यात येत आहे. लाभार्थी कुटूंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार मान्यता प्राप्त खासगी व शासकीय रुग्णालयात घेता येणार आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत लाभार्थ्यांना ई-कार्डस वाटप करण्यात आले. कार्यक्र माचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी मांडले. संचालन डॉ. श्रध्दा सपाटे यांनी केले तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी मानले.