शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

कचारगड महोत्सवाला सुरूवात

By admin | Updated: January 31, 2015 23:22 IST

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कचारगड यात्रा महोत्सव होत आहे. याची सुरूवात शनिवारी झाली. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : चार दिवस चालणार विविध कार्यक्रमसालेकसा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कचारगड यात्रा महोत्सव होत आहे. याची सुरूवात शनिवारी झाली. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या सोई सुविधा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी प्रत्यक्ष यात्रा परिसराची शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पाहणी केली.या भेटीच्या वेळी क्षेत्राचे जनप्रतिनीधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित झाले. यात क्षेत्राचे आमदार संजय पुराम, जिल्हा शल्य चिकित्सड डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवने, देवरीचे उपविभागीय पोलीस उपविभागीय अधिकारी देवरे, राकेश शर्मा, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेंद्र घागरे, प्रभारी खंडविकास अधिकारी मडामे, पंचायत समितीचे उपसभापति मनोज विश्वकर्मा, शंकर मडावी, डॉ.डी.बी. चिमणे, सालेकसा येथील विविध विभागाचे विभाग प्रमुख, ईतर अधिकारी व कर्म:चारी व कार्यक्षेत्रातील जनप्रतिनीधी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवने, पोलीस उपविभागी अधिकारी देवरे, राकेश शर्मा, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र घागरे, पंचायत समितीचे उपसभापती मनोज विश्वकर्मा, डॉ.डी.बी. चिमणे या सर्वांसह सर्व परिसराची धनेगाव पासुन ते पहाडी वरील मंदिर परिसरापर्यंत प्रत्येक्ष स्थानांची पाहणी केली. यात्रेकरूच्या सुरक्षीततेची व परिसरातील विविध विभागांच्या द्वारे देण्यात येणाऱ्या सोई व सुविधांची पाहणी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी आरोग्य विभागाकडुन देण्यात येणाऱ्या रूग्णालय सालेकसा येथील डॉ.महेंद्र घागरे यांची चमू व रूग्णवाहिका ही यात्राचे स्वयंपाक कार्यालयाजवळ २४ तास उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच १ मोबाईल मेडिकल फिरते पथक सालेकसा डोगर पायथ्यापासी असे एकंदरीत ७ पथकांच्या माध्यमातुन यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना व श्रद्धालुंना पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरविण्यात येईल. तसेच रात्रकालीन पथक ही लावण्यात आलेले आहेत. यात्रेत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता दैनंदिन जवळ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार, परिचर व स्वच्छक, आशा कार्यकर्ता असे एकुण ७० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन आरोग्य सेवा दैनंदिन पुरविण्यात येईल. याप्रकारे यात्रेकरीता आरोग्य यंत्रणा औषधीसाठ्यासह सज्ज राहिल. तीव्र परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र दर्रेकसा येथे रूग्णास दाखल करून उपचार देण्यात येईल. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी जिल्हाधिकारींना दिली. त्याच प्रकारे जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांसह जमाकुडो या ईमारतीच्या नवीन बांधकामाचीही प्रत्येक स्थानावर जाऊन पहाणी केली. (तालुका प्रतिनिधी)