शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विना अनुदानित शिक्षकांचे भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित, अघोषीत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक बिनपगारी काम ...

ठळक मुद्देरस्ता रोकोनंतर स्थिती जैसे थे : पाच वर्षापासून केवळ आश्वासनावर बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित, अघोषीत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक बिनपगारी काम करीत आहेत. त्यांना वेतन देण्यात यावे या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समिती गोंदिया जिल्हा शाखेने शुक्रवारी (दि. १६) गोंदिया शहरात भिक मांगो आंदोलन केले.आपल्या मागण्यांना घेऊन माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समिती गोंदिया जिल्ह्यातर्फे शासन स्तरावर २२१ आंदोलने करण्यात आली. आता शेवटचे २२२ वे बेमुदत शाळाबंद धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु आहे.शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषीत ठेवून या सर्वाची म्हणजे १४६+१६५६ शाळाची अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुध्दा केली.त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा.शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी केली आहे.अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. तसेच याला महाराष्ट्र शासनच पूर्णपणे जबाबदार राहील. अघोषीत उच्च माध्यमीक शाळांची घोषणा करुन अनुदान जाहीर करावे, या मागणीला घेऊन गोंदिया जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांनी शुक्रवारी फुलचूर परिसरात भीक मांगो आंदोलन केले. 

टॅग्स :Teacherशिक्षक