लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कुंभारेनगर नंतर आता सिव्हील लाईन्स परिसरातही कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दररोज वाढतच चालली आहे. असे असतानाही मास्क न लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब लक्षात घेत आता नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण खुद्द मैदानात उतरले आहे. त्यांनी शनिवारी (दि.१८) मास्क न लावणाºया ९२ जणांवर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसलेल्या दुकानदारांना दणका दिला.कोरोनावर सध्या कोणतेही औषध तयार झालेले नाही. यामुळे सध्या तरी मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे हेच रामबाण उपाय ठरत आहेत. या उपायांची काटेकोरपणे अंंमलबजावणी करण्याचे ठरवून देत शासनानेही लॉकडाऊन शिथिल केले आहे.पण नागरिकांकडून अद्याप या उपायाबांबत गांभीर्य दिसत नाही. आपल्या मर्जीने त्यांचे वागणे सुरू आहे. त्यातही आतापर्यंत ठिक होते, मात्र आता शहरात कोरोना आपले पाय पसरत आहे. शहरातील कुंभारेनगरनंतर आता सिव्हील लाईन्स परिसरातही रूग्ण आढळून आले आहेत.दररोज रूग्णांची संख्या वाढत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यासाठी हा प्रकार गंभीर ठरत आहे.त्यानंतरही नागरिक मनमानी करीत असल्याने नगर परिषद मुख्याधिकारी चव्हाण शनिवारी (दि.१८) खुद्द मैदानात उतरले. याप्रसंगी त्यांच्यासोबत प्रशासनिक अधिकारी सी.ए.राणे, लिपीक प्रदीप द्विवेदी, मुकेश मिश्रा आदि कर्मचारी होते. नगर परिषदेने बाजार परिसरात नियमांच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्यासाठी तयार केलेल्या पथकासोबत त्यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी मास्क न लावणाऱ्यांना व्यक्तींना दणका देत कारवाई केली. आतापर्यंत नगर परिषदेचे पथक कारवाईसाठी निघत होते. मात्र आता शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे बघत मुख्याधिकाऱ्यांनाच मैदानात उतरण्याची पाळी आली आहे. त्यामुळे आतातरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे नगर परिषद प्रशासनाकडून सांगीतले जात आहे.१२ हजार २०० रूपयांचा दंड वसूलमुख्याधिकारी चव्हाण व पथकाने शनिवारी मास्क न लावणाºया ९२ जणांवर तसेच अग्नि किराणा, डॉ. शिबू आचार्य, एचडीएफसी बँक येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करीत १२ हजार २०० रूपयांचा दंड वसुल केला. यापूर्वीही नगर परिषदेने गठीत केलेल्या या ३ पथकांकडून कारवाया केल्या जात आहेत.
नियम मोडणाऱ्यांना दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST
कोरोनावर सध्या कोणतेही औषध तयार झालेले नाही. यामुळे सध्या तरी मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे हेच रामबाण उपाय ठरत आहेत. या उपायांची काटेकोरपणे अंंमलबजावणी करण्याचे ठरवून देत शासनानेही लॉकडाऊन शिथिल केले आहे.पण नागरिकांकडून अद्याप या उपायाबांबत गांभीर्य दिसत नाही. आपल्या मर्जीने त्यांचे वागणे सुरू आहे.
नियम मोडणाऱ्यांना दिला दणका
ठळक मुद्देमुख्याधिकारी उतरले मैदानात : मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई