गोंदिया : भरउन्हात घशाला कोरड पडली तर पाण्याऐवजी थेट स्वस्तात मिळणाऱ्या शीतपेयांचा अनेकजण आधार घेतात; मात्र उन्हाळ्यात याच शीतपेयांचा एक ग्लास तुम्हाला थेट रुग्णालयात घेऊन जातो. त्यामुळे सोबत पाण्याची बाटली बाळगा किंवा स्वच्छ घ्या, असे केले जागीच शीतपेयांचा आनंद आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी आहे.
एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा डोळे दाखवू लागला आहे. उन्हात घामाच्या धारांनी चिंब भिजलेला गोंदियाकर साहजिकच रेल्वेस्थानकाबाहेर किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या लाल फडक्यात गुंडाळलेल्या माठातील गारेगार पेयांकडे आपसूक वळतो. घशाला लागलेली कोरड शीतपेय पिण्यास आपल्याला प्रवृत्त करते; पण हीच शीतपेये आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. यामधील अनेक भेसळयुक्त शीतपेयांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा काही विक्रेत्यांकडून काही नमुने ताब्यात घेतले आहेत. आरोग्यास अपायकारक पदार्थ आढळल्यास थेट कारवाईचा इशाराही दिला आहे. उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला शीतपेयांची सर्रास विक्री सुरू होते. गारेगार लस्सी, बर्फ घातलेलं ताक, फळांचे रस अशा पद्धतीच्या शीतपेयांची विक्री सर्वत्र पाहायला मिळते.
अशी घ्या काळजी...
- या शीतपेयांमध्ये मुख्यत्वे दूध, लस्सी किंवा ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थाचा वापर केल्यास फायदा होतो.
- लिंबूपाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राखली जाते. अशा स्थितीत शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
- उन्हाळ्यात थंड दूध पिणे जास्त फायदेशीर आहे. 3 पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि अल्सरचा त्रास होत असेल तर थंड दूध चांगला उपाय आहे.
- दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान थेट उन्हात जाणे टाळावे. घराबाहेर असल्यास पाणी पीत राहिल्यास शरीरातील पाणीपातळी योग्य राहील. तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.