शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची धावपळ होताना दिसत आहे. गावखेड्यात बाहेरून घर वापसी झालेल्या मजुरांमुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.

ठळक मुद्देगणखैरा परिसरातील गावे सील : तालुक्यात भीतीचे वातावरण, उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ५७ दिवस ‘लाकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करणाऱ्या तालुकावासीयांना ‘लॉकडाऊन’ शिथिल होताच अवघ्या ८ दिवसांत धक्का बसला. तालुक्यातील ग्राम गणखैरा व आबेंतलाव येथे कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने परिसरातील गावे सील करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि.२३) तालुक्यात ३ कोरोनाग्रस्त रूग्ण मिळाल्याने सर्वच दहशतीत असून रस्त्यांवर कमालीची शांतता बघायला मिळत आहे.परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची धावपळ होताना दिसत आहे. गावखेड्यात बाहेरून घर वापसी झालेल्या मजुरांमुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.तालुक्यात २५ मार्चपासून आतापर्यंत सहा हजार १९१ नागरिकांनी घर वापसी केली आहे. यातील बºयाच लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अनेक जण अजूनही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहे.स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोरोना वाढीस अनुकुल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ८ दिवसांपूर्वी पुणे वरून आलेला मजूर घरी आला याविषयी नगर पंचायतला कळविण्यात आले. पण नगर पंचायतचे जबाबदार कर्मचारी साधा फोन उचलण्याचीही तसदी घेत नाही. यावरून येथील नगर पंचायत कोरोना बाबतीत उदासीन असल्याचे दिसते. नगर पंचायत हद्दीत कोरोना विषयक अपडेट देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. पण इथे सर्व टोलवाटोलविची कामे सुरू आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याची जबाबदारी नगर पंचायतची आहे. पण नगर पंचायत स्वत: काहीच करीत नाही आणि कुणी माहिती दिली तर त्याकडेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.गणखैरा येथे अत्यावश्यक सेवाही बंदतालुक्यातील ग्राम गणखैरा येथे कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने रस्त्यावर कमालीची शांतता आहे. सोबतच किराणा दुकानही बंद ठेवण्यात आले आहे. गणखैरात चारही बाजूने कडकडीत बंद असून फक्त अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना सोडले जात आहे. तर सोबतच ग्राम आंबेतलाव येथे शनिवारी १ रूग्ण मिळाल्याने तेथील १६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. गावात पोलीस चौकी तयार करण्यात आली असून गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. किराणा दुकानापासून सर्व काही बंद करण्यात आले असल्याची माहिती सरपंच योगेश चौधरी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.राबणारे राबतात, बाकीचे नॉटरिचेबल.नगर पंचायतच्या सुस्त धोरणामुळे कोरोना वाढीस वाव मिळत आहे असा आरोप नागरीक करीत आहे. मात्र ग्रामपंचायत कोरोना बाबतीत एक पाऊल पुढे आहेत. गावखेड्यात शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. सध्या शहरात आशा वर्कर आणि एक तलाठी जी.व्ही.गाढवे राबताना दिसत आहेत. २-४ नगरसेवक सोडले तर उर्वरितांचा पत्ता नाही. सुरूवातीला महादान करणारे नगरसेवक कठीण समयी गायब झाले आहे. आशा सेविका घरोघरी जाऊन बाहेरून आलेल्यांची माहीती गोळा करीत आहेत.त्या तिघांना क्वारंटाईन कक्षात केले दाखल५ दिवसांपूर्वी बाहेरून आलेल्या तिघांना येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र त्यांना नगर पंचायतकडून कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. तसेच क्वारंटाईन सेंटरवर कुणालाही नियुक्त करण्यात आले नाही. शनिवारी रात्री उशीरा प्रमोद जैन यांनी प्रतिनिधीला याबद्दल माहिती दिली असता लगेच या विषयी तहसीलदार नरेश वेदी यांना दूरध्वनीवर माहिती दिली. यावर त्यांनी तलाठी गाढवे व नोडल अधिकारी सतीश बावनकर यांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सुध्दा त्यांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे, नगर पंचायतने कोरोना अपडेटसाठी ज्या २ कर्मचाऱ्यांना नियुक्त केले ते फोन उचलत नाही. रविवारी सकाळी हाच प्रकार घडला. तालुका वैद्यकिय अधिकारी सुद्धा सकाळी १० वाजता नॉटरिचेबल होते.

येथील जगत महाविद्यालयात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना स्वच्छ पाणी, सॅनिटायझर, भोजन, झोपण्यासाठी व्यवस्थित बेड व मास्कची व्यवस्था नगर पंचायत आणि तहसील कार्यालयने केली पाहिजे.- हौसलाल रहांगडाले, गोरेगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या