शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘बे मौसम बरसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:44 IST

मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळलेले असतानाच शनिवारी (दि.२४) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी (दि.२५) पहाटे दमदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे.

ठळक मुद्दे२६४.५० मीमी. पावसाची नोंद : पावसामुळे थंडीचा जोर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळलेले असतानाच शनिवारी (दि.२४) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी (दि.२५) पहाटे दमदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत २६४.५० मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ८.०२ एवढी आहे. या ‘बे मौसम बरसात’मुळे मात्र मागील काही दिवसांपासून कमी झालेल्या थंडीचा जोर पुन्ह वाढला आहे.जिल्ह्यात थंडीचा कमी जोर कमी होत होता. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण ढगाळलेले होते. अशात गुरूवारी (दि.२४) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर शुक्रवारी (दि.२५) पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावून जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. जिल्हयात २६४.५० मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.०२ एवढी सरासरी आहे. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात ६५.२० मीमी. एवढा सर्वाधीक पाऊस बरसला आहे. तर देवरी तालुक्यात ११.२० मीमी. म्हणजेच सर्वात कमी पाऊस बरसल्याची नोंद आहे.या अवकाळी पावसामुळे शहरातील स्वच्छतेची पोलखोल झाली. शहरातील रेल्वे स्टेशन लगत रस्त्यावर नालीतील घाण रस्त्यावर आल्याने नागरिकांनी त्या चिखलातूनच ये-जा करावी लागली. याशिवाय या पावसामुळे धान खरेदी केंद्रांवर बाहेर पडून असलेल्या धानाला नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आदिवासी महामंडळाचे धान उघडयावर पडून राहत असल्याने पूर्वीच ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आल्याचे महामंडळाचे अधिकारी सुरेश आंबटकर यांनी सांगीतले. तर सोबतच जिल्ह्यातील पिकांना या पावसामुळे फटका बसण्याची शक्यचाही नाकारता येत नाही.

टॅग्स :Rainपाऊस