शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नाल्यावर आंघोळ, उघड्यावर शौचास जाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 9:50 PM

बाबाटोली येथे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिक राहत असून येथील एकाही कुटुंबाकडे प्रसाधनगृह व शौचालयाची सोय नाही. परिणामी येथील महिला व पुरुषांना गावापासून काही अंतरावर असलेल्या कुआढास नाल्यावर जाऊन आंघोळ करावी लागते. तर शौचालयाची सोय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. अशात महिला, मुलींची मोठी कुंचबना होते.

ठळक मुद्देमहिलांची कुंचबना : शौचालय व प्रसाधनगृहाची सोय नाही, प्रशासनाचे दुर्लक्ष

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बाबाटोली येथे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिक राहत असून येथील एकाही कुटुंबाकडे प्रसाधनगृह व शौचालयाची सोय नाही. परिणामी येथील महिला व पुरुषांना गावापासून काही अंतरावर असलेल्या कुआढास नाल्यावर जाऊन आंघोळ करावी लागते. तर शौचालयाची सोय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. अशात महिला, मुलींची मोठी कुंचबना होते.मात्र बाबाटोलीतील नागरिकांच्या समस्येकडे अद्यापही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष न गेल्याने त्यांच्या समस्या कायम असल्याचे चित्र आहे.एकीकडे देशात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक घरी शौचालयाची व्यवस्था शासनामार्फत करुन देण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ बाबाटोली वासीयांना मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजाने आजही येथील लोकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा जिल्हा हागणदारी मुक्तीचा दावा सुध्दा फोल ठरला आहे. केंद्र शासनातर्फे २०१९ पर्यंत प्रत्येक घरी शौचालय असेल दावा केला जात. मात्र २०१९ उजाळायला केवळ चार महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने हा दावा कितपत खरा ठरेल, याची कल्पना न केलेलीच बरी. बाबाटोलीवासीय फकीर असले तरी ते आज घडीला सालेकसा नगरपंचायतचे नागरिक व मतदार आहेत.प्रत्येक निवडणुकीत ते मतदानाचा हक्क बजावितात. मात्र त्यांनाच मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.या परिसरात महिला व मुली असून त्यांनाही सन्मानाने जगण्याची इच्छा आहे. परंतु निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांना सुध्दा विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.आंघोळीला नाल्यावर जावे लागते परंतु महिला-मुली तिथे जाण्यास घाबरतात. अशात अनेक महिला आणि मुलींना राहण्याच्या ठिकाणीच उघड्यावर आंघोळ करुन घ्यावी लागते. येथील छोटी मुले तर आठ आठ दिवस आंघोळ करीत नाही. त्यामुळे त्यांना आजारांची लागण होत आहे.मुलांचे आईवडील दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर असतात. त्यामुळे मुले दिवसभर बेवारस फिरत असतात किंवा शहरात येऊन भीख मागतात. मात्र हा परिसर आता सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ठ झाला आहे.नगर रचनेप्रमाणे बाबाटोलीवासीयांना सुद्धा सोयी सुविधा व शासनाचा लाभ मिळण्याची गरज आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सुध्दा याकडे लक्ष देवून बाबाटोलीवासीयांच्या समस्या दूर करण्याची गरज आहे.ज्वलंत समस्या लक्षात घेता बाबाटोली येथे लवकरच सार्वजनिक शौचालयाची सोय करुन देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक घरी स्वतंत्र शौचालय तयार करण्यात येईल. बाबाटोलीतील समस्या नगर पंचायतच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू.- उमेदलाल जैतवार, बांधकाम सभापती, न.प. सालेकसा