शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकालाही पुजारीटोलाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:40 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती.

ठळक मुद्दे१०० दलघमी पाणी सोडले । बाघ नदीचे पात्र कोरडे पडल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मागील आठ दहा दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात होता. रेल्वे स्थानकाला सुध्दा पाणी टंचाईची झळ बसली होती. यावर मात करण्यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाने रेल्वे प्रशासनाच्या मागणीवरुन पुजारीटोला धरणाचे १०० दलघमी पाणी बाघ नदीच्या पात्रात शुक्रवारी (दि.२४) सोडले. त्यामुळे काही दिवस तरी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही.गोंदिया रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीला बिरसोली येथील बाघ नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा बाघ नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले. परिणामी रेल्वे स्थानक आणि कर्मचारी वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. बाघ नदीत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीने तळ गाठल्याने चार दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता. ही समस्या ओळखत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मल्लिकाअर्जुन राव यांनी जिल्हाधिकारी आणि बाघ सिंचन प्रकल्पाला पत्र लिहून बाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर बाघ सिंचन प्रकल्प विभागाने बुधवारी (दि.२२) पुजारीटोला धरणाचे पाणी सोडले. मात्र हे पाणी रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत बाघ नदीच्या पात्रात पोहचणार असल्याची माहिती संबधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने केवळ १०० दलघमी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गरजेच्या तुलनेत सोडण्यात आलेले पाणी फार कमी असून पुन्हा पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती आहे.देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सिरपूरबांध जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. त्याचीच दखल घेत सिरपूर जलाशयातून पाणी सोडण्यात आले. यासाठी या जलाशयाचे दोन गेट उघडण्यात आले होते. जवळपास २७० दलघमी मिटर पाणी या जलाशयातून सोडण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जलाशयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले.गरज भासल्यास पुन्हा सोडणार पाणीमागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे केवळ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले. विशेष म्हणजे सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची अंतीम मुदत ही २० मे पर्यंत असते. मात्र यंदा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्याची मुदत संपली असली तरी गरज भासल्यास पुन्हा पाणी सोडण्यात येईल असे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई