शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

बँकांनी ८२ टक्के शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:10 IST

म्हणे, शेतकऱ्यांची क्रेडिटच नाही : जिल्ह्यातील बँकाचा प्रताप, शेतकऱ्यांना ठेवले वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :शेती व्यवसाय हा सध्या नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे उधारी, उसनवारी करून शेतकरी आपली शेती करतो. मात्र, व्याजात शेतकरी आपली जमीनही घालवून बसतो. शेतकऱ्याला या चक्रातून काढण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना लागू केली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन हजार ५२३ शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डकरीता अर्ज केले. परंतु फक्त ६४४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेत अर्ज करणाऱ्या ८२ टक्के शेतकऱ्यांना बँकांनी क्रेडिट कार्ड दिलेच नाही.

एकीकडे शासन म्हणते शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड द्या, पण दुसरीकडे शासनाच्या या उपक्रमाची अंमलबजावणी बँका करत नाही तरीही 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशी अवस्था जिल्ह्यात आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना अंमलात आणते; परंतु योजना सुरू केल्यावर त्यांची अंमलबजावणी किती झाली, त्या योजनेत अडचण काय याकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांच्या सुरू केलेल्या योजना हवेतच राहतात. 

कमी व्याजदरात शेतकरी हा पशुपालनासाठी तसेच शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करू शकतो. शेती व्यवसाय करताना अनेकदा शेतकरी हा सावकाराकडून उसने पैसे घेतात. मात्र, ते फेडताना शेतकरी व्याजाच्या चक्रात अडकतो. या फंदातून बाहेर काढण्यासाठी शासनाने किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना लागू केली आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, कुक्कुटपालनासाठी दोन लाख, तर एक लाखापर्यंत पीक कर्ज दिले जाते. परंतु या योजनेला काळीमा फासण्याचे काम जिल्ह्यातील बँकांनी केले आहे. जिल्ह्यातील फक्त १८.२७ टक्केच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन हजार ५२३ शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डकरीता अर्ज केले. परंतु फक्त ६४४ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात आला. शासन म्हणते योजना घ्या; परंतु बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हैसकिसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाय, म्हैस, कुक्कुटपालनासाठी दोन लाख रुपये कर्ज दिले जाते, त्यामुळे शेतकरी शेतीसोबत जोडधंद्यातूनही उत्पन्न घेऊ लागला आहे. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड हे फायदेशीर आहे. शेती करताना मोठा खर्च करावा लागतो. यासाठी शेतकरी हा किसान क्रेडिट कार्डचा वापर करून एक लाखापर्यंत पीककर्जसुद्धा घेऊ शकतो.

शासन म्हणते योजना घ्या; बँकेकडून कर्ज मिळेनाशासन म्हणते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्या आणि त्या क्रेडिट कार्डच्या आधारावर गायी, म्हशींकरीता कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. परंतु क्रेडिट कार्डकरीता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी क्रेडिट कार्ड नाकारले आहे. शेतकऱ्यांचा सिबील स्कोअर बरोबर नसल्याने दिलेले कर्ज कसे फेडणार यासाठी प्रश्नचिन्ह उपस्थित करून बँकांनी कर्ज दिले नाही.

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रbankबँकfarmingशेती