शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बनगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा संकटात

By admin | Updated: January 21, 2017 00:33 IST

आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी

अत्यल्प वसुली : २३ गावांत उद्भवणार समस्या गोंदिया : आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुन्हा एकदा संकटात आली आहे. पाणीपट्टीच्या अत्यल्प वसुलीमुळे २३ गावातील पाणी पुरवठा १ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. आमगाव तालुक्यातील १९ गावांची पाणीपट्टी वसुली ७० टक्क्यांपेक्षा कमी असून ती पाणीपट्टी वसुली ३२ लाख १० हजार ७६४ रुपये इतकी आहे. बोरकन्हार या ग्राम पंचायतवर १ लाख ६८ हजार ७२० रुपये, बाम्हणी १ लाख २० हजार ३२० रुपये, पदमपूर २ लाख ३० हजार ६४ रुपये, रिसामा ६ लाख ६५ हजार ७० रुपये, बनगाव ३ लाख ५ हजार २२० रुपये, शिवनी १ लाख ६० हजार १२० रुपये, चिरचाळबांध २ लाख ५५ हजार १०० रुपये, खुर्शीपार १ लाख ९८ हजार २८४ रुपये, जवरी १ लाख २ हजार २० रुपये, मानेगांव १ लाख २ हजार २०० रुपये, किकरीपार १ लाख १७ हजार ४६० रुपये, कातुर्ली २ लाख २८ हजार ६७६ रुपये, वंजारीटोला ५५ हजार ५०० रुपये, ननसरी ४८ हजार ४२० रुपये, सरकारटोला ७० हजार ३८० रुपये, घाटटेमनी १ लाख २६ हजार रुपये, पानगाव १ लाख ४० हजार ८२० रुपये, कुंभारटोली ४८ हजार ३२० रुपये, आमगाव ६८ हजार ७० रुपये या तालुक्यातील बिर्सी ७० टक्के, किडंगीपार ७६ टक्के, ठाणा ८० टक्के, सुपलीपार ७१ टक्के, मोहगाव १०५ टक्के आणि फुक्कीमेटा ९० टक्के पाणीपट्टी वसूली झाली आहे. सालेकसा तालुक्यातील चार गावातील ६ लाख ३३ हजार ९७० रुपये पाणीपट्टीची थकबाकी आहे. त्यात साखरीटोला ३ लाख २९ हजार २६० रुपये, कारूटोला १ लाख ४४ हजार ५० रुपये, सातगाव ६२ हजार २०० रुपये, हेटी ९८ हजार ४६० रुपये या गावाचा समावेश है. सालेकसा तालुक्यातील पाणीपट्टी वसूलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या गावातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) महिन्याकाठी ७ लाख ५० हजारांचा खर्च सदर पाणी पुरवठा योजना सुरू ठेवण्याकरिता महिन्याकाठी ७ लाख ५० हजार रुपये खर्च येतो. त्यात ३ लाख रूपयाचे वीज देयक, १ लाखाचे रसायन व ३ लाख ५० हजार रुपये मनुष्यबळ खर्च येतो. प्रत्येक गावाची पाणीपट्टी वसूली ७० टक्के होणे आवश्यक आहे. योग्य व सक्षम नियोजनाअभावी २००८ पासून सुरू झालेल्या या योजनेची पाणीपट्टी वसूल झाली नाही. परिणामी ही योजना नेहमीच संकटात येते. ग्राम पंचायत मधील मतांचे राजकारण व ग्राम पंचायत मधील कर्मचारी या वसुलीला कारणीभूत आहेत.