काचेवानी : डोळे वगळून संपूर्ण चेहऱ्याला कापड बांधून फिरणे हे सरंक्षणाच्या दृष्टीने योग्य असले तरी याचा दुरूपयोग होऊ लागला आहे. पोलीस विभागाच्या शिफारसीने कायदा करून डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय तोंडाला मुसका बांधणाऱ्या युवावर्गावर गुन्हा नोंदविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तिरोडा ते गंगाझरी या बसमार्गावरील स्थानक व काचेवानी, तिरोडा आणि गंगाझरी या रेल्वे स्थानकांवरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही प्रेमी युगुल जंगल भागाकडे जावून मौजमस्ती करीत असल्याच्या घटना नागरिकांच्या तोंडावर आहेत. तिरोडा ते गंगाझरी बसमार्गाच्या उत्तर दिशेला सगळीकडे जंगल परिसर असून या जंगलाचा गैरफायदा अधिकाधिक प्रेमी युगुल किंवा अनैतिक संबधासाठी घेतले जात असल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले आहे. जंगल परिसरात जाणारे पन्नास टक्के युवक तोंडाला कापड बांधलेले असतात. तर स्त्रिया किंवा मुलींचे कापड बांधण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. तिरोडा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून अदानी वीज प्रकल्पाचे काम सुरू असून या ठिकाणी दुरदुरचे व अन्य प्रांताचे मजूर व कर्मचारी कामावर आहेत. त्यामुळे काही लोभी प्रवृत्तींच्या महिला आणि कुमारिका त्यांच्या बळी पडत असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. काचेवानी, तिरोडा आणि एकोडी येथे काही अनोळखी तोंडाला कापड बांधलेल्या (फक्त डोळे दिसतात) रेल्वे किंवा बसने उतरतात व मोबाईलने संपर्क करतात. यानंतर सांगितलेल्या जागेवर येवून त्या युवकासह निघून जात असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही दिवसांपूर्वी बरबसपुरा बसस्थानकावरसुध्दा दोन मुली येऊन कमीत कमी दोन ते तीन तास बसून राहिल्या असल्याचे येथील पानटपरी चालकांनी सांगितले होते. यासंबधी काही पानटपरी चालकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दिवसभर डोळे मिटून तर राहत नाही. मात्र ते निश्चित कोण असणार, हेसुध्दा सांगू शकत नाही. तोंडाला झाकून असणाऱ्या आणि वावरणाऱ्या मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मोबाईलव्दारे वास्तविकता कळत नाही आणि तोंडाला कापड बांधले असल्याने ओळखता येत नाही, ही गंभीर समस्या आहे. गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याचे हेही प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. तिरोड्याकडून डाकराम/सुकडी, बोदलकसा, मंगेझरी आणि निमगाव/इंदोराकडे, काचेवानी, एकोडी व दांडेगावकडून काचेवानी, धामनेवाडा, जुनेवानी आणि संग्रामपूर जंगलात जोडपे भ्रमणास जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
चेहरा झाकण्यावर बंदी घाला
By admin | Updated: October 14, 2014 23:20 IST