शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:49 IST

अर्जुनी-मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि.३) वाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि.३) वाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.येथील दुर्गा चौकातून बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात तालुक्यातील शेतकरी बांधव व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यावेळी मोचेकऱ्यांनी सत्तारूढ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वाढती महागाई आणि शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला.शहरातील मुख्य मार्गावर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रुपातंर सभेत झाले. सभेला पदाधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले.त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, गिरीष पालीवाल, राजेश नंदागवळी, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, राजू पालीवाल, वंदना शहारे, उर्मिला जुगनाके, शीला पटले, सुनील लंजे, कृष्णा शहारे, इंद्रदास झिलपे, सोमेश्वर सौंदरकर, नितीन भालेराव, इंजि. आनंदकुमार जांभूळकर, सुभाष देशमुख, संजय नाकाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून देशात पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईत वाढ होत आहे.त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात.शेतकऱ्यांना उत्पादन खर्चासह ५० टक्के नफा जोडून हमी भाव देण्यात यावा. उज्वल गॅस जोडणी योजनेचा गाजावाजा केला जात असली तरी त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही.शासनाच्या धोरणामुळे किंमती वाढ व जीएसटीची भर पडल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने अन्यायकारक धोरणे रद्द करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा विरोधात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

टॅग्स :congressकाँग्रेस