शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आज पोळा; उत्सव सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:38 IST

Gondia : शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त गावागावांत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे. या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

कृषी कार्यात हजारो वर्षांपासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाच्या ठरलेला आहे. त्यात शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्त्वाचा राहिलेला आहे. शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राच्या वापर वाढला असला तरी छोट्या शेतकऱ्यांना प्रत्येक बाबतीत यंत्राच्या साह्याने शेती करणे महागात पडत असते. म्हणून आजही गावागावांत पाच एकरपर्यंत शेती असलेले छोटे शेतकरी आपल्या घरी वर्षभर किमान एक बैलजोडी ठेवून त्यांच्या भरवशावर शेती करतात. अशात शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल.

वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावास्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो. या दिवशी बैलांकडून कोणतेही कामे केली जात नसून त्यांना अंघोळ करून वेगवेगळ्या पद्धतीने सजवून पुरणपोळी खाऊ घालून पूजा केली जाते.

असा साजरा होतो सण पोळ्याचा सण श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावास्येच्या दिवशी येत असून, या दिवशी शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलांना नदीवर किवा तलावात नेऊन चांगल्या पद्धतीने धुऊन घरी आणतो. या दिवशी बैलांना खांद्यावर किंवा जखमा असलेल्या ठिकाणी हळद आणि तुपाचा लेप लावला जातो. शेतकरी आपल्या जीवलग मित्र असलेल्या बैलांना आपल्या ऐपती- प्रमाणे सजवण्याच्यासाठी बाजारातून वेगवेगळे श्रृंगार साहित्याची खरेदी करून आणतो. बैलांना मारुतीच्या देवळासमोर नेऊन नमन करतो व घरी आणतो. शेतकऱ्याची कारभारीण ओवाळणी करीत बैलांना पुरणपोळी खाऊ घालते. नंतर बैलगडी आपल्या बैलांना गावात घरोघरी नेतो त्याला प्रत्येक घरी बोजारा दिला जातो.

अशी झाली परंपरेची सुरुवात धार्मिक आख्यायिकेनुसार एकदा भगवान शंकरांच्या मनात आले की, त्यांचे प्रिय वाहन नंदी त्यांना नेहमी सुख-दुःखात साथ देत असतात. त्यांची आपण ही एकदा तरी पूजा करावी, ही इच्छा भगवान शंकराने पार्वतीजवळ व्यक्त केली. पार्वतीने होकार दिल्यानंतर भगवान शंकराने श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावास्येच्या दिवशी नंदीची अंघोळ करून त्याला चांगल्या प्रकारे सजविले आणि माता पार्वतीने तयार केलेल्या पुरणपोळ्या नंदीला खाऊ घातल्या व तो दिवस पूर्ण नंदीसाठी समर्पित केला. तेव्हापासूनच दरवर्षी श्रावण महिन्याच्या कुशावटी अमावास्येच्या दिवशी बैलपोळा साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली.

टॅग्स :gondiya-acगोंदिया