शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

विश्व उत्कृष्ट बुध्दिस्ट नेतृत्व पुरस्काराने बडोले सन्मानित

By admin | Updated: February 28, 2016 01:46 IST

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना २३ फेब्रुवारी रोजी थायलंड येथील...

गोंदिया : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना २३ फेब्रुवारी रोजी थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट संस्थेतर्फे ‘दी वर्ल्ड बुध्दीस्ट आउटस्टेंडिग लीडर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ना. बडोले यांच्या बौद्ध समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या जागतिक स्तरावरच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. ना. बडोले हे थायलंड येथे २२ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसीय समारंभात सपत्निक उपस्थित होते. विश्वस्तरावर थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट संस्था १०० हून अधिक विद्यापीठ तसेच ५ हजाराहून अधिक सक्रिय सदस्यांच्या माध्यमातून अंतर्गत शांती शिक्षण व धुम्रपान, मद्यपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामावर कार्य करीत आहे. मागील ३३ वर्षापासून ही संस्था सकारात्मक व्यवहार बदलात सहभाग, राष्ट्रीयत्व व सार्वभौमता या नैतिक मूल्यांवर कार्य करीत असून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व विश्वस्तरीय उत्कृष्ट बुध्दीस्ट नेतृत्व करणाऱ्यांचा सन्मान करते. ना. राजकुमार बडोले यांच्या जागतिक स्तरावरील या सन्मानाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)