शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

बॅडमिंटन हॉल ८ महिन्यांपासून कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:49 IST

खेळातून तरूणांचा विकास व्हावा या उद्देशातून येथे ६.१४ हेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. आतापर्यंत २१ कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात तब्बल ३ कोटी २० लाख ३० हजार रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचा (इनडोअर)चा लाभ आतापर्यंत येथील लोकांना घेता आला नाही.

ठळक मुद्दे३ कोटी २० लाखांतून बांधणी : जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावे इनडोअर हॉल

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खेळातून तरूणांचा विकास व्हावा या उद्देशातून येथे ६.१४ हेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. आतापर्यंत २१ कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात तब्बल ३ कोटी २० लाख ३० हजार रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचा (इनडोअर)चा लाभ आतापर्यंत येथील लोकांना घेता आला नाही. मागील ८ महिन्यापूर्वीच सज्ज असलेला हा हॉल कुलूपबंद आहे.२ एप्रिल २०१२ पासून जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम व तेथील विविध हॉलचे बांधकाम करण्यात आले. ६.१४ हेक्टर परिसरात उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूू घडणे अपेक्षीत असल्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. परंतु नियोजनशून्यतेमुळे २१ कोटी खर्च झालेल्या या क्रीडा संकुलाचा लाभ जिल्हावासीयांना मिळत नसल्याची खंत क्रीडा प्रेमी व खेळाडूंकडून व्यक्त केली जात आहे. क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या इनडोअर बॅटमिंटन हॉलचे बांधकाम जुलै महिन्यातच पूर्ण झाले.या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करण्यासाठी १ आॅगस्ट २०१८ ला बैठक घेण्यात आली. परंतु या बांधकामाचे श्रेय लाटण्याच्या हेतून लोकप्रतिनिधींनी ते लोकार्पण होऊ दिले नाही. त्यांच्या दबावाला पाहून प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करण्याचा माणसच सोडला. ३ कोटी २० लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या या बॅडमिंटन हॉलचा उपयोग खेळाडूंना व्हावा म्हणून खेळाडू वारंवार क्रीडा अधिकारी यांच्याकडे येत आहेत. परंतु खेळाडूंच्या त्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खेळाच्या विकासासाठी शासनाने जिल्ह्यावर खर्च केलेले २१ कोटी रूपये पाण्यात गेले असे म्हणायला हरकत नाही. खेळाडूंच्या विकासासाठी जी साधने उपलब्ध आहेत त्याचा फायदा खेळाडूंना घेण्यासाठी का अडकविले जात आहे हे न समजणारे कोडे आहे.महिन्याकाठी बुडतो ७० हजारांचा महसूलजिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉलमध्ये चार कोट आहेत. हे चारही कोट सुरू केले की सकाळी ४ तास व सायंकाळी ४ तास असे ८ तास खेळाडूंना खेळण्यासाठी सहज मिळू शकतात. यातून शासनाला उत्पन्न देखील मिळू शकतो. मागील ८ महिन्यांपासून हे बॅडमिंटन हॉल सुरू न केल्यामुळे महिन्याकाठी ७० हजार रूपयांचा महसूल बुडत आहे. ज्या खेळाडूंच्या विकासासाठी ८ महिन्यांपासून तयार केलेले हे हॉल बंद असल्यामुळे आतापर्यंत सुमारे ५ लाख ६० हजार रूपयांचे उत्पन्न या हॉलपासून मिळू शकले नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी खुला करावा इनडोअर हॉललोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने या हॉलचे लोकार्पण लोकप्रतिनिधींच्या हातून होणार नाहीच. परंतु जिल्हाधिकारी या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्ष असल्यामुळे त्या हॉलला खेळाडूंसाठी खुले करू शकतात. त्यांनी खेळाडूंच्या मागणीला पाहून बॅडमिंटन हॉल खुले करण्याची मागणी होत आहे.क्रीडा संकुलात अशा हव्यात सुविधाजिल्हा क्रीडा संकुलात पॅव्हेलियन बिल्डींग, फुटबॉल ग्राऊंड, ४०० मीटर धावनपथ, जलतरण तलाव, इनडोअर हॉल, वसतीगृह, क्रीडा साहित्य, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, डायनिंग हॉल, किचन, लॉबी, क्रिकेट ग्राऊंड अशी सोय असावी. या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. परंतु उभारणी झाल्यानंतरही ज्या खेळाडूंसाठी ही सुविधा आहे त्यांनाच याचा लाभ दिला जात नाही. वसतीगृहाचे काम अपूर्ण आहे तेही लवकरच होत आहे.

टॅग्स :BadmintonBadminton