शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

दोघांचे पाच लाख रुपये करणार परत

By admin | Updated: December 27, 2016 02:11 IST

दिड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक यंत्रणेच्या दक्षता व भरारी पथकांनी पाच

विधान परिषद निवडणूक : तिघांच्या ५० लाखांवर निर्णय नाही गोंदिया : दिड महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक यंत्रणेच्या दक्षता व भरारी पथकांनी पाच ठिकाणांवरून पकडलेल्या एकूण ५५ लाखांच्या रकमेपैकी ५० लाखांच्या रकमेचा हिशेब अद्याप लागलेला नाही. त्यातील दोन जणांकडून पकडण्यात आलेली जवळपास ५ लाख १० हजारांची रक्कम त्यांना परत करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तिघांच्या रकमेचा तपास अजून पूर्णत्वास गेला नसून ती प्रकरणे पुन्हा समितीकडे ठेवण्यात येणार आहेत. वास्तविक निवडणूक काळात संशयास्पद आर्थिक व्यवहारात जप्त करण्यात आलेल्या रकमेचा तपास आयकर विभागाकडे सोपविल्यानंतर १० दिवसात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे. त्यासाठी १० अधिकाऱ्यांची एक समितीही गठीत करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल दिड महिना पूर्ण होत आला तरी तीन प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. यासंदर्भात आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. १६ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या जीवन के नाथ यांच्याकडून २ लाख ५ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले होते. १७ नोव्हेंबर रोजी जुरीया येथील सतीशकुमार पटेल यांच्या जवळून पाच लाख ७ हजार ५०० रूपये जप्त करण्यात आले. या दोघांना त्यांची रक्कम परत करण्यात येणार आहे. परंतु मध्यप्रदेशातील जबलपूर येथून गोंदियाकडे येत असलेल्या इनोव्हा कारमधून १५ नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या नोटांचे २० बंडल (२० लाख रुपये) पियुषकुमार प्रकाशचंद चौबे (४९), रा.वर्धमान नगर, राजनांदगाव (छत्तीसगड), यशवंतकुमार धनीराम जंघेल (२६) रा.चिखली (जि.राजनांदगाव) आणि गाडीचालक संतोष निसार (३३) रा.राजनांदगाव या तिघांकडून जप्त करण्यात आले होते. ओरिसा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या टोयोटा फॉर्च्युनर या वाहनातून देवरी सीमेवरील नाक्यावर २५ लाख रुपये कर्नलसिंह ताठे व तजेंद्रसिंह सिद्धू (दोघेही रा.नागपूर) यांच्याकडून जप्त करण्यात आले. एमएच ३१, डीसी ७१५७ या टोयोटा फॉर्च्युन वाहनातून २५ लाख रुपये वाहून नेत होते. तसेच सडक-अर्जुनी येथील अजय लांजेवार यांच्याकडून गोरेगावजवळ १८ नोव्हेंबर रोजी २ लाख ८३ हजार रूपये मिळाले होते. या तिघांची रक्कम आता परत केली जाणार नाही. समितीसमोर हे प्रकरण आहे. यावर पुन्हा विचार केल्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)