खातिया : भारतीय बौद्ध महासभा सर्कल कामठाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती कार्यक्रम कामठा शाखेत घेण्यात आला. यावेळी सुरुवातीला सर्वप्रथम महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्त्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आली.
अध्यक्षस्थानी कामठा सर्कलचे अध्यक्ष योगीराज वंजारी होते. प्रमुख पाहुणे तालुका संरक्षण उपाध्यक्ष मनोहर भावे, नरेंद्र बोरकर, कार्यालयीन सचिव विजय मेश्राम, संस्कार सचिव देवानंद हुमणे, तालुका महिला सचिव धर्मशीला शेंडे, हिशोब तपासनीस मयाराम गजभिये, सर्कल महासचिव विजेंद्र मेश्राम व बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. मनोहर भावे यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाई ही प्रेरणा होती. माता रमाई यांचा जीवन म्हणजे दारिद्र्य, उपासमार यातना आणि दुखात काढले आणि त्यांनी आपले सर्व जीवन बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सर्कल महासचिव विजेंद्र मेश्राम यांनी केले, तर आभार मयाराम गजभिये यांनी मानले.