शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली

By admin | Updated: April 15, 2017 00:57 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालयांपासून तर अनेक संस्था, संघटनांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. ग्राम पंचायत तेढा तेढा-निंबा : येथील ग्राम पंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सरपंच रत्नकला भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी ग्रा.पं.सदस्य खेमराज उईके, सिंधु सागोळकर, वच्छला राऊत, हिरोज राऊत, शैलेंद्र वाघमारे, प्रमोद साखरे, संदीप राऊत व नागरिक उपस्थित होते. यावेळी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. विदर्भ प्रदेश विकास परिषद गोंदिया : विदर्भ प्रदेश विकास परिषद गोंदियातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जिल्हाध्यक्ष मोनू राठौड यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून अ‍ॅड. चंद्रशेखर गजभिये, अ‍ॅड. सतीश सुखदेवे, अ‍ॅड. राय, अभिनव सुखदेवे, बबलू कुरील उपस्थित होते. मनोहर म्युनिसिपल हायस्कूल गोंदिया : मनोहर म्युनिसिपल हायस्कूल येथे मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून पर्यवेक्षक राजेंद्र धाबर्डे, हेमराज शहारे, सुनिल रहांगडाले, हेमराज बोकाडे, रविशंकर बिसेन, रेखा पाटणकर, प्रमोद सोनवाने, दिप्ती तावाडे, अजेस टेकाम, सुलभा चौधरी उपस्थित होते. संचालन व आभार दामोदर धुवारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मधुकर जाधव, किशोर तावाडे, शारदा कुंभरे, शिवकुमार उपरीकर, प्रिया सालवे, दुर्गा शहारे उपस्थित होते. जीईएस हायस्कूल पांढराबोडी गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेतर्फे संचालित जीईएस हायस्कूल आणि कला, विज्ञान महाविद्यालय पांढराबोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रभारी मुख्याध्यापक एम.एम.बैस यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून ए.जी.टेंभरे, प्रा.एस.सी.सुखवार, विनोद माने, एस.एच.पोरचट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जी.एम.दुधबरई यांनी केले. कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालय आसोली गोंदिया : प्रांजल शिक्षण संस्थेतर्फे संचालित के.एम.कोल्हटकर, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसोली येथे प्राचार्य विजय टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. अजय वाढई, भूमेश्वरी कटरे, मिनाक्षी मेश्राम, गीता गणविर, राकेश बोरकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत, कविता सादर करून भाषण दिले. पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था गोंदिया : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था शाखा गोंदियाच्या वतीने संचालक सुरेशगीर रिधनार्थी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी खु.व्ही.नागफासे, एस.के.भोयर, एस.बी.रहांगडाले, डी.ए.वरखडे, मंगरु हिरापुरे, मुकेश लामटे उपस्थित होते. वनविभाग आमगाव आमगाव : वनविभाग आमगावतर्फे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डी.बी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला क्षेत्र सहायक एल.एस.भुते, भांडारकर, शितलादेवी येडे, एस.एम.पवार व इतर कर्मचारी उपस्त्थित होते. स्वामी विवेकानंद विद्यालय इटखेडा : येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती तसेच नवोदित शिक्षण संस्था इटखेडाचे माजी मुख्य संस्थापक सचिव स्व. डॉ.महादेवराव शेंडे यांचा १३ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक जे.जी.करंजेकर, वाय.पी.फुंडे, ग्रा.पं.सदस्य चेतन शेंडे होते.गावातील आनंद बुध्द विहार येथील पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली. संचालन सांस्कृतिक प्रमुख एस.एम.आकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी एफ.आर.भाकरे, संजय खुणे, जे.पी.मेश्राम, वाय.के.मेश्राम, एच.एस.आदे, पी.एम.डोंगरवार, प्रा. खुशाल पेशने, प्रा. अनिल भावे, हरिभाऊ शेंडे, हटवार, राजू शेंडे यांनी सहकार्य केले. नवोदय हायस्कूल केशोरी केशोरी : स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती प्रभात फेरी काढून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक हलमारे, प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक नरेंद्र काडगाये, प्रा. प्रकाश बोरकर, प्रा. रवि शिंगणजुडे, प्रा. हिवराज साखरे, चरण चेटुले, एस.बी.रहांगडाले, आर.एस.वंजारी, प्रा. दिनेश नाकाडे, आर.एम.मारबते, नुतन चेटुले, भावना उईके उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील लोकगीते आणि भाषणे सादर केलीत. प्रास्ताविकातून प्रा. मुरलीधर मानकर, संचालन भावना उईके तर आभार श्रीनिवास कॉलेजवार यांनी मानले. यावेळी प्रा.हिवराज साखरे, आर. एस. वंजारी, एम.एस.काडगाये यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद हायस्कूल सडक-अर्जुनी : येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुख्याध्यापिका एम.एन.भौतिक यांच्या अध्यक्षतेखाली साजरी टरण्यात आली. अतिथी म्हणून आर.एस.डोये,