शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

बाबासाहेबांमुळेच बौद्ध धम्म भारतात वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने धम्मगिरी येथे रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन म्यानमारचे भदंत डॉ. यु. चंद्रामुनी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे चंद्ररतन थेरो, तपस्वी थेरो, नागसेव बोधी, श्रद्धाबोधी थेरो, गुजरातचे प्रज्ञारत्न डॉ. जीवक थेरो, भदंत धम्मशिखर, भंते अनिरुद्ध, भंते महेंद्र भंते, धम्मतप, डॉ. बुद्धरत्न महाथेरो व भिख्खु संघ उपस्थित होते.

ठळक मुद्देडी.रेवत महाथेरो : धम्मगिरी येथे आंतरराष्ट्रीय धम्म संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : भारताबाहेरील थायलंड, म्यानमार, श्रीलंका, चीन, जपान अशा अनेक देशांत बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. मात्र त्याप्रमाणात भारतात या धम्माचा प्रसार झाला नव्हता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या प्रमुख धर्माचा अभ्यास करुन समता व आचरणावर आधारित वैज्ञानिक धम्माचा स्विकार केला. त्यामुळेच भारतात नसलेला धम्म बाबासाहेबांमुळे भारतात सर्वत्र पसरला असे प्रतिपादन भदंत डॉ.डी.रेवत महाथेरो यांनी केले.येथील लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने धम्मगिरी येथे रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन म्यानमारचे भदंत डॉ. यु. चंद्रामुनी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे चंद्ररतन थेरो, तपस्वी थेरो, नागसेव बोधी, श्रद्धाबोधी थेरो, गुजरातचे प्रज्ञारत्न डॉ. जीवक थेरो, भदंत धम्मशिखर, भंते अनिरुद्ध, भंते महेंद्र भंते, धम्मतप, डॉ. बुद्धरत्न महाथेरो व भिख्खु संघ उपस्थित होते.तर दुसऱ्या सत्रात धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चंद्रबोधी पाटील होते. मुख्य मार्गदर्शक डॉ. रमेश राठोड, तनुजा नेपाळे व प्रमुख पाहुणे म्हणून बालेश्वर चौरे, कुवर रामटेके, इंजि. आर. एन. रावते, भरत वाघमारे, समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, संस्थापक सचिव यादव मेश्राम, वैशाली खोब्रागडे, राजभूषण मेश्राम, महेंद्र मेश्राम, राजकुमार वंजारी, रजनी रामटेके, ज्योती तागडे, एल.एच. बन्सोड, नरेश शेंडे, सुनील गजभिये, रामेश्वर श्यामकुंवर, चिंकेश शेंडे, अनुप गडपांडे, राकेश रामटेके, मुनेश्वर मेश्राम उपस्थित होते.यावेळी ‘मानवी कल्याणासाठी वैज्ञानिक बुद्ध धम्माची गरज’ या विषयावर डॉ. राठोड यांनी तर नेपाळे यांनी ‘धम्म संस्कारात महिलांची भूमिका’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. संमेलनादरम्यान नि:शुल्क आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. मेंढे, डॉ. मोहन, डॉ. संदीप आंबेडकर, डॉ. दीक्षीत, डॉ. संतोष येवले, डॉ. अक्षय बोरकर, डॉ. नेहा बोरकर, डॉ. साहू, डॉ. कटरे, डॉ. निर्मला साहू, डॉ. गंधे, डॉ. धमेंद्र टेंभरे यांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार केला.उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन दिलीप मून व राकेश रामटेके यांनी केले. आभार प्रशांत रावते यांनी मानले. तर धम्म परिषदेचे संचालन प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे व प्रा. मिलींद रंगारी यांनी केले. आभार प्रफुल शिंगाडे यांनी मानले. संमेलनात विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेश व जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनुप गडपांडे, राकेश रामटेके, मुनेश्वर मेश्राम, समितीचे सर्व सदस्य, भीम गर्जना संघटनेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सेवक, धम्मगिरी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, भाजी विक्रेता संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर