शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

ऑटो टिप्पर काढण्याचा मुर्हूत निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 6:00 AM

नगर परिषदेकडे कचरा संकलनासाठी ऑटो टिप्पर असताना कंत्राटदाराच्या भरवशावर काम चालत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. त्यातल्या त्यात नगरसेवक पंकज यादव व लोकेश यादव यांनी स्वच्छता विभागातील अभियंता उमेश शेंडे यांना त्वरीत ऑटो टिप्पर काढण्याच्या सूचना दिल्या. यावर शुक्रवारी (दि.१०) अभियंता शेंडे यांनी २२ ऑटो टिप्पर काढून त्यांना कचरा संकलनासाठी वॉर्डात पाठविले.

ठळक मुद्देकचरा टाकताच नगर परिषदेला आली जाग : २२ ऑटो टिप्पर लावले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिन्यापासून धूळ खात पडून असलेले ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेला अखेर मुर्हूत मिळाला. शुक्रवारी (दि.१०) स्वच्छता विभागाकडून २२ ऑटो टिप्पर काढण्यात आले असून कचरा संकलनासाठी वॉर्डांत पाठविण्यात आले.विशेष म्हणजे, गुरूवारी नगरसेविका ज्योत्सना मेश्राम यांनी कचरा फेकल्याचा हा परिणाम असल्याचे नगर परिषदेत बोलले जात आहे.यावरून कुणी अंगावर आल्यावरच काम करायचे असे काहीसे गणित नगर परिषदेत लावले जात आहे.१ जानेवारीपासून शहरातील कचरा उचलण्याचे काम देण्यात आलेल्या कंत्राटादाराने काम बंद केले आहे. परिणामी कचऱ्याची उचल होत नसल्याने अवघ्या शहरात कचऱ्याचे ढिगार लागल्याचे दिसून येत आहे. यातच दलित वस्तीत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मधील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे नगरसेविका ज्योत्स्ना मेश्राम त्यांचे पती संदिप मेश्राम व नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी निर्माण झालेली कचऱ्याची समस्या सोडविण्याबाबत पदाधिकाऱ्यांकडे चर्चा केली. मात्र त्यावर काहीच तोडगा न निघाल्याने गुरूवारी (दि.९) त्यांनी वॉर्डातून कचरा उचलून आणला व स्वच्छता विभाग तसेच नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या दालनात टाकला. या घटनेमुळे नगर परिषदेत वातावरण चांगलेच तापले होते.नगर परिषदेकडे कचरा संकलनासाठी ऑटो टिप्पर असताना कंत्राटदाराच्या भरवशावर काम चालत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. त्यातल्या त्यात नगरसेवक पंकज यादव व लोकेश यादव यांनी स्वच्छता विभागातील अभियंता उमेश शेंडे यांना त्वरीत ऑटो टिप्पर काढण्याच्या सूचना दिल्या. यावर शुक्रवारी (दि.१०) अभियंता शेंडे यांनी २२ ऑटो टिप्पर काढून त्यांना कचरा संकलनासाठी वॉर्डात पाठविले. मागील ६ महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरीचे तर कधी मुख्याधिकारी नसल्याचे कारण सांगून सडत ठेवण्यात आलेल्या ऑटो टिप्परचा मुर्हूत अखेर निघाला.विशेष म्हणजे, नगरसेविका ज्योत्स्ना मेश्राम व नगरसेवक संकल्प खोब्रागडे यांनी गुरूवारी नगर परिषदेत चांगलाच गोंधळ घातल्यानंतर तसेच कचरा आणून टाकल्याने स्वच्छता विभागातील सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मागणी केल्यावर एक गाडी त्यांच्या वॉर्डात पाठविली जात नव्हती. मात्र गुरूवारी त्यांनी आपले उग्र रूप दाखविल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या वॉर्डात एक नव्हे तर दोन गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. याशिवाय स्वच्छता विभागातील सर्वच कर्मचारी वॉर्डांतील कचरा संकलनासाठी नियोजन करीत असल्याचेही दिसले.त्याच एजंसीवर पुन्हा मेहरबानीकर्मचाºयांचे ७-८ महिन्यांचे पगार थकवून बसलेल्या एजंसीवर नगर परिषदेने पुन्हा एकदा मेहरबानी दाखवून दिली आहे. आहे त्या कर्मचाºयांचे पगार थकवून ठेवले असताना स्वच्छता विभागाने २२ ऑटो टिप्परसाठी चालक व वाहक त्याच एजंसीकडून घेतले आहेत. एकीकडे सभेत या एजंसीचे काम बंद करण्यासाठी ठराव घेतला जातो. तर दुसरीकडे त्याच एजंसीला कामे देऊन पुन्हा आपूलकी जोपासली जात आहे.यात मात्र कुणाचे कुणाशी अडत आहे हेच कळेनासे झाले आहे. मात्र या एजंसीचे नाळ एखाद्या मोठ्या व्यक्तीशी तर जुळलेले नाही ना अशी चर्चाही नगर परिषद वर्तुळात सुरू आहेत.जिल्हाधिकाऱ्यांना राग अनावरनगर परिषदेत झालेल्या सर्व वादंगाला घेऊन नगरसेवक पंकज यादव व अन्य काहींनी या सर्व प्रकाराला जिल्हाधिकारी जवाबदार असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडून महिने महिने प्रशासकीय मंजुरी दिली जात नाही. परिणामी कामे अडतात असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांना माहिती मिळाल्याने त्यांना राग अनावर झाला असून त्यांनी संबंधित एका अधिकाऱ्याला या विषयाला घेऊन झापल्याची चर्चा आहे. नगर परिषदेत सुरू असलेल्या या सर्व कारभाराला घेऊन आतातरी त्यांनी रोख-ठोक भूमिका घेण्याची गरज आहे असे बोलले जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका